पुणे महानगरपालिका .सावरकर भवन पुणे शहर अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील ठेकेदाराकडून संबंधित अधिकाऱ्यांना मिठाई वाटप – ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना मिठाई वाटप – हितसंबंध, भ्रष्टाचार चौकशी व ठेकेदारांकडून भेटवस्तू स्वीकारण्यास बंदीची मागणी
पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०२५
पुणे महानगरपालिकेच्या सावरकर भवन क्षेत्रीय कार्यालयात ठेकेदाराकडून संबंधित अधिकाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकारामुळे प्रशासनातील हितसंबंध व भ्रष्टाचाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नागरिकांकडून या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस (कंडक्ट) नियम, १९७९ नुसार, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने आपल्या कामाशी संबंधित ठेकेदार, पुरवठादार किंवा व्यक्तीकडून गिफ्ट, मिठाई, बक्षीस किंवा लाभ स्वीकारू नये, असे स्पष्टपणे नमूद आहे.
क्राईम महाराष्ट्र लाईव्हचे संपादक आमिर मोहम्मद शेख यांनी या प्रकरणाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार ईमेलद्वारे पाठवली असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच भविष्यात अशा कोणत्याही ठेकेदारांकडून भेटवस्तू, मिठाई किंवा इतर स्वरूपातील लाभ स्वीकारण्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्व माहिती सार्वजनिक करण्यात यावी व चौकशी अहवाल जनतेसमोर सादर करावा, अशीही नागरिकांची मागणी आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833



















