महादजी शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वानवडी बाजार, पुणे येथे शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन
पुणे (दि. ३ नोव्हेंबर २०२५):
राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १, पुणे यांच्या वतीने महादजी शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वानवडी बाजार येथे भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये शाळेतील इयत्ता ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसह महादजी शिंदे प्राथमिक शाळा व श्री. हरिभाऊ बळवंतराव गिरमे शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी साजऱ्या झालेल्या पोलीस शहीद स्मृतिदिन तसेच ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी साजऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त हे शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाची संकल्पना मा. कमांडंट सौ. तेजस्विनी सातपुते (मॅडम) यांची होती.
कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापिका सौ. एस. ए. काश्मरी मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. वाणी मॅडम, श्री. नलावडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा. पोलीस निरीक्षक श्री. विजय गोरड साहेब, पो. हवालदार श्री. संजय देवकर, पो. हवालदार श्री. सागर जगताप, पो. हवालदार श्री. वैजनाथ खेडकर यांनी परिश्रम घेतले.
तसेच शाळेचे माजी विद्यार्थी श्री. हनीफ शेख व श्री. रमजान शेख यांनी सक्रिय सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना पोलीस दलातील विविध अत्याधुनिक शस्त्रे, सुरक्षासाहित्य आणि त्यांचा वापर याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार रुजविण्याचा हेतू या प्रदर्शनामागे होता.
— सौ. एस. के. आभ मुख्याध्यापक, महादजी शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वानवडी बाजार, पुणे

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























