Homeताज्या बातम्याराज्य राखीव पोलिस दल सेवा निवृत्त कर्मचारी संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहमेळावा व...

राज्य राखीव पोलिस दल सेवा निवृत्त कर्मचारी संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहमेळावा व व्याख्यानाचे आयोजन

राज्य राखीव पोलिस दल सेवा निवृत्त कर्मचारी संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहमेळावा व व्याख्यानाचे आयोजन

पुणे | प्रतिनिधी
दि. 26 जानेवारी 2026 रोजी राज्य राखीव पोलिस दल (SRP) गट क्रमांक 2, लेक्चर शिर्के हॉल, वानवडी, पुणे येथे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य राखीव पोलिस दल सेवा निवृत्त कर्मचारी संघ, पुणे यांच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध हास्यकथानाथक श्री शांतीनाथ रामचंद्र मांगले साहेब यांचे मनोरंजक व प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या विनोदी शैलीतून त्यांनी पोलिस दलातील अनुभव, सेवा काळातील आठवणी आणि समाजातील सकारात्मक मूल्ये यांचे सुंदर सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या हास्यपूर्ण कथनामुळे संपूर्ण सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे संस्थापक श्री आर. डी. जाधव साहेब, उपाध्यक्ष श्री व्ही. जी. तळवार साहेब, संयोजक श्री राकेश डी. जाधव, श्री प्रसाद आर. जाधव तसेच श्री गुंगा जगताप साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व नियोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी पंजेतन पवित्र संघटना यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री हनीफभाई शेख,
पंजेतन पुणे शहर महिला आघाडी ग्रुप उपाध्यक्ष कु. फिजा शेख,
कार्याध्यक्ष सौ. फलक शेख,
कोंढवा अध्यक्ष सौ. सना शेख
यांच्या हस्ते श्री आर. डी. जाधव साहेब व श्री गुंगा जगताप साहेब यांना प्रजासत्ताक दिन सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेला हा स्नेहमेळावा सर्व उपस्थितांच्या स्मरणात राहील असा ठरला.
एकूणच हा कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा व आपुलकी निर्माण करणारा ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात आजपासून ईआरपी एक्स्पोचे आयोजन | पुणे बातम्या

पुणे: औद्योगिक डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात 7 ते 9 मे दरम्यान एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील...

सांगलीतील व्यापाऱ्याला बारामतीत आमिष दाखवून लुटले, ४ जणांना अटक. पुणे बातम्या

पुणे: बारामती तालुका पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्यात सहभागी असलेल्या चौघांना गुन्ह्याच्या काही तासांतच अटक केली, त्यांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून बाजारभावापेक्षा कमी...

आळंदीतील धर्मशाळांमधील लेखापरीक्षणात गर्दी, निकृष्ट अन्न आणि दुर्लक्ष उघड झाले आहे. पुणे बातम्या

पुणे: महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या लेखापरीक्षणात पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावरील आळंदी या मंदिरात असलेल्या अनेक धर्मशाळा आणि धार्मिक वसतिगृहांमधील चिंताजनक परिस्थिती...

आजोबांनी 9 वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा निषेध केला. पुणे बातम्या

पुणे: रात्री 6 वाजता एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातवावर (9) झोपडीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या विरोधात मंगळवारी रात्री अनेक शहरवासीयांनी पर्वती आणि...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप; पुणे न्यायालयाचा निकाल

पुणे: पुणे शहरातील एका अत्यंत क्रूर आणि खळबळजनक खुन खटल्याचा निकाल लागला असून, स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली...

error: Content is protected !!