हॉटेलमध्ये जास्त पाणी बॉटलचे बिल लावून ग्राहकांची फसवणूक
FDA व ग्राहक कार्यालयात तक्रार दाखल
पुणे (येरवडा) :
शहरातील हॉटेल व्यवसायात ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असल्याचा आणखी एक प्रकार येरवडा परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत FDA व राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रार क्रमांक 8589479 असा आहे.
याबाबत माहिती देताना सचिन अगन भोसले यांनी सांगितले की, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ते आपल्या मित्रमंडळीसह राधा हॉटेल, आळंदी रोड, मेटल कॉर्नर बसस्टॉप समोर, येरवडा, पुणे येथे चहा पिण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी फक्त एकच पाणी बॉटल घेतली होती. मात्र बिल तपासल्यानंतर असे निदर्शनास आले की हॉटेल चालकाने दोन पाणी बॉटलचे बिल लावून अतिरिक्त पैसे आकारले.

एकच बॉटल घेतली असतानाही जाणीवपूर्वक जास्त बिल लावणे हा प्रकार ग्राहकांची फसवणूक व अन्यायकारक व्यापार पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.
सदर प्रकरणाची दखल घेत FDA तसेच ग्राहक तक्रार निवारण कार्यालयाने तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित हॉटेलवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार सचिन भोसले यांनी केली आहे.
तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे सामान्य ग्राहकांची फसवणूक होत असून प्रशासनाने यावर कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
—

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























