पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल अरुण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान राखत, तसेच त्यांना श्रद्धांजली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद देऊन मोठेपण दाखवावे, अशी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र (महाराष्ट्र शासन) तथा मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक : अध्यक्ष : अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे. 
अरुण पवार म्हणाले, की सध्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून, स्व. अजितदादा पवार हे महायुतीतील अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी नेते होते. राज्याच्या राजकारणासोबतच विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांमध्ये अजित पवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
अरुण पवार पुढे म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याचा सन्मान हा सर्वपक्षीय असायला हवा. स्व. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी दिलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हा एक सकारात्मक आणि समन्वयाचा संदेश देणारा निर्णय ठरेल.
असा निर्णय घेतल्यास महायुती सरकारकडून राजकीय परिपक्वता, सलोखा आणि विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका अधोरेखित होईल, तसेच राज्यातील नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ई-मेल द्वारे विनंती पत्र ही पाठवले आहे

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























