श्रीक्षेत्र थेऊर येथे महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना अखेरची श्रद्धांजली.
प्रतिनिधी थेऊर
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. ना. श्री. अजितदादा पवार यांचे नुकतेच झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने राज्याने एक कर्तबगार, लोकप्रिय आणि जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व गमावले आहे.
दादांच्या निधनाची बातमी समजताच श्रीक्षेत्र थेऊर येथे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या. लाडक्या दादांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी थेऊर येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
शोकसभेसाठी श्रीक्षेत्र थेऊर येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ व सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली. सर्व उपस्थितांनी हात जोडून अजितदादा पवार यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























