Homeताज्या बातम्याकोलवडीतील लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये वीजचोरी उघड; लाखोंचा गैरवापर, गुन्हा दाखल

कोलवडीतील लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये वीजचोरी उघड; लाखोंचा गैरवापर, गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोलवडी परिसरात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत हा गैरप्रकार समोर आला असून संबंधितांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी भरारी पथकाने कोलवडी येथील लक्ष्मी हॉस्पिटल परिसरात तपासणी केली. यावेळी हॉस्पिटलमधील वीज जोडणी व मीटरची पाहणी केली असता, अधिकृत मीटरला वगळून थेट डीपी स्विचद्वारे वीज वापर सुरू असल्याचे आढळले. तसेच हॉस्पिटल व घरगुती वापरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे निष्पन्न झाले.
तपासणीदरम्यान दोन वेगवेगळ्या मीटरमध्ये अनियमितता आढळून आली. एका मीटरवर 3454 युनिट्स तर दुसऱ्यावर 5101 युनिट्स वापराची नोंद असून, प्रत्यक्षात वीज वापर अधिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गेल्या 44 महिन्यांत सुमारे 21,392 युनिट्स वीजचोरी झाल्याचे समोर आले असून, यामुळे महावितरण कंपनीला अंदाजे ₹3.29 लाखांचे नुकसान झाले आहे.
तसेच घरगुती वापरासाठी मागील 35 महिन्यांत 5,188 युनिट्स वीजचोरी झाल्याचे आढळले असून, यातून सुमारे ₹91 हजारांचे नुकसान झाले आहे. एकूणच या प्रकरणात लाखोंचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात संबंधितांनी काही रक्कम भरल्याची नोंद असली तरी, संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर वीज वापराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मा. श्री. विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला...

माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती...

पुणे: उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नाना बिऱ्हाडे यांनी पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयातील कामकाजावर गंभीर ताशेरे ओढत माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती दडपल्याचा...

शिक्षकांवरील गैर-शैक्षणिक ओझे कमी करण्यासाठी सरकार काम करत आहे, असे भुसे म्हणाले. पुणे बातम्या

पुणे : राज्य सरकार समाजातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देत शिक्षकांवरील गैर-शैक्षणिक कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शालेय...

मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे - जुन्नर येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने ७ एप्रिल रोजी एका ३९ वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची...

“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा”

“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा” महा सब ज्युनियर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फेडरेशनतर्फे खेळाडू, प्रशिक्षक व संस्थांचा गौरव पुणे : जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त महा सब...

error: Content is protected !!