अहिल्यानगर.. दि.३० मार्च
अहिल्यानगर येथील प्रहार करिअर अकॅडमी चे संचालक तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनोद सिंग परदेशी यांचे वतीने लोकनायक बच्चूभाऊ कडू ज्युनिअर कॉलेज चे उद्घाटन आणि प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता मेळावा व कार्यशाळा निमित्त आयोजित दोन दिवशिय शिबिर प्रसंगी राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उत्कृष्ट अशा निवडक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगर चे गणेश रामदास भालके , सौ. वंदना संजय कांबळे, सौ. अफसाना सुलेमान सय्यद यांचा बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे युवा जिल्हाप्रमुख पांडुरंग औताडे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख चंद्रकांत कराळे, बाळासाहेब खरजुले, जालिंदर अरगडे आदींसह हजारो प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























