कोथरूड परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मशी पार्क, डावी भुसारी कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील कपाट फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹५,४२,०००/- किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला. घरमालक बाहेरगावी असताना ही चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
पुणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























