पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील गजबजलेल्या बाजीराव रोड परिसरात, BSNL ऑफिसच्या समोर ज्ञानेश्वर हॉटेल व राजेश्वर हॉटेल समोर असलेल्या झाडांबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या जागेत सिमेंटचा कोबा (काँक्रिट कव्हर) करण्यात येत असून, यामागे झाडांची नैसर्गिक वाढ रोखून त्यांची हळूहळू कत्तल करण्याचे नियोजन असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, झाडांच्या मुळांभोवती पूर्णपणे सिमेंट टाकल्याने माती, पाणी व हवा यांचा प्रवाह बंद होतो, ज्यामुळे झाडे हळूहळू सुकतात. संबंधित ठिकाणी असेच काम सुरू असल्याचे दिसून येत असून, यामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या संदर्भात संजय आनंद बावळेकर (मो. 9850422707) यांनी अधिकृत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
नियमांनुसार, झाडांच्या भोवती किमान मोकळी जागा ठेवणे बंधनकारक असताना, येथे मात्र संपूर्ण परिसर सिमेंटने बंद करण्यात येत असल्याचे फोटोमधून स्पष्ट होते. हा प्रकार पुणे महानगरपालिकेच्या गार्डन विभागाच्या नियमांचे उल्लंघन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच झाडांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा, हा प्रकार शहरातील हरित संपत्तीवर मोठा घाला ठरू शकतो.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























