Homeताज्या बातम्यापुणे क्राईम ब्रँच युनिट-२ ची मोठी कारवाई : वर्षभर फरार असलेला पाहिजे...

पुणे क्राईम ब्रँच युनिट-२ ची मोठी कारवाई : वर्षभर फरार असलेला पाहिजे आरोपी अंमली पदार्थांसह जेरबंद

पुणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने प्रभावी कारवाई करत तब्बल वर्षभर फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दिनांक १९/०४/२०२६ रोजी करण्यात आली असून आरोपीकडून अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत. �
Unit 2 Crime Branch Press Note dt.19.04.2026.pdf
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्ज्वल माने, शिवाजी कागुडे व शंकर कुमार यादव यांना गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार दिघी परिसरातील भोसरी रोड भागात एक इसम संशयित अवस्थेत थांबलेला असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता संबंधित इसम ताब्यात घेण्यात आला. चौकशीदरम्यान त्याचे नाव ओंकार महेश शेरस (वय २५ वर्षे) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडून अंदाजे १०० ग्रॅम गांजा (किंमत सुमारे ४०,००० रुपये) जप्त करण्यात आला.
तपासात पुढे उघड झाले की, आरोपी ओंकार शेरस हा यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यातील (गु.र.नं. ११८/२०२५ सह भा.दं.वि. कलमे व म.पो.अॅक्ट कलमे) वर्षभरापासून फरार असलेला पाहिजे आरोपी आहे. तसेच त्याच्यासोबत अंमली पदार्थ ठेवणारे आणखी दोन साथीदारांविरुद्ध आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असून त्या गुन्ह्याच्या तपासासाठीही त्याचा शोध सुरू होता.
या प्रकरणात पुढील तपास आंबेगाव पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थासंबंधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. नितीन पिंगळे तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना जावळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला. पथकात
पोलीस निरीक्षक ओमकार साळवे
पोलीस अंमलदार उज्ज्वल माने, शिवाजी कागुडे, शंकर यादव, संकेत कोकाटे, सोमेश गव्हाणे, राहुल खोत, यश कुमार, संजय जाधव, साधना ताहाणे, सहमा तांबोळी, निलेश वडखा, रफिकेश खबदार, संजय आवाने, ओंकार कुमार व विनायक वाघारे
यांचा समावेश होता.
पोलीसांच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे. पुणे बातम्या

पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारा आरोपी जेरबंद; दोन दुचाकी जप्त

पुणे, दि. १९ एप्रिल २०२६ : लोहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल SUV मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे बातम्या

पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे बातम्या

पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले असून, आजच्या राजकारणात निष्ठा...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

error: Content is protected !!