Homeताज्या बातम्यापुणे : मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात चंदननगर पोलिसांची मोठी कारवाई; ४८ तासांत आरोपी...

पुणे : मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात चंदननगर पोलिसांची मोठी कारवाई; ४८ तासांत आरोपी जेरबंद, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या मोबाइल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक करून तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चंदननगर पोलिस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास साईनगर भागामधील घरामधून एकूण ७ मोबाईल फोन चोरीला गेले होते. याप्रकरणी दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इसम नामे वेदांत गणेश चव्हाण, वय १९ वर्षे, रा. मांजरी, पुणे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपीकडून चोरीस गेलेले एकूण ७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. तसेच जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवघ्या ४८ तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-४ पुणे शहर सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदननगर पोलिस स्टेशन नितेश बडगूजर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोले धर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस अंमलदार डी.आर. लिंगण्णा, गुरव, डोंगरे, बेंद्रे व लहाने यांनी ही कारवाई केली.

चंदननगर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोबाईल चोरीच्या गुन्हेगारास ०४ तासात पकडून ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर कारवाई करत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या ०४ तासांच्या आत ताब्यात घेत ६६ हजार रुपयांचा...

सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान

पुणे, दि. 28 एप्रिल: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध...

मराठी न येणाऱ्या चालकांचे लायसन्स रद्द? पँजतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ...

मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द करण्याच्या कथित निर्णयाविरोधात निवेदन; मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पँजतन पवित्र संघटनेची तक्रार पुणे, दि. 28 एप्रिल: मराठी...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास | पुणे बातम्या

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

error: Content is protected !!