Homeताज्या बातम्याकाळेपडळ पोलिसांची कामगिरी: ०३ दुचाकी, ०१ रिक्षा व ०१ मोबाईल हॅन्डसेट चोरणाऱ्या...

काळेपडळ पोलिसांची कामगिरी: ०३ दुचाकी, ०१ रिक्षा व ०१ मोबाईल हॅन्डसेट चोरणाऱ्या विधीसंघर्षित बालकास मुद्देमालासह ताब्यात

​पुणे:
पुणे शहर अंतर्गत येणाऱ्या काळेपडळ पोलीस स्टेशनच्या गु.र.नं. २९२/२०२६, भा.न्या.सं.क. ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व तपास पथकातील पोलीस अंमलदार सी.सी.टी.व्ही.च्या माध्यमातून तपास करत होते. दरम्यान, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील चोरी झालेली दुचाकी एका इसमाकडे असून तो हिलग्रीन शाळेपुढे जाणाऱ्या रोडवर, उंड्री येथे थांबलेला आहे.
​सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस स्टाफने त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून एका विधीसंघर्षित बालकास चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाकी, एक रिक्षा आणि एक मोबाईल फोन चोरी केल्याचे उघडकीस आले.
​जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील:
​ओप्पो मोबाईल फोन: काळेपडळ (कोंढवा) पोलीस स्टेशन, पुणे (गु.र.नं. १२०८/२०२४), किंमत २०,०००/- रुपये.
​होंडा ड्रीम युगा दुचाकी (आर.टी.ओ. क्रमांक- एम.एच. १२/के.यु./६४३१): काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे (गु.र.नं. ५१/२०२६), किंमत ४०,०००/- रुपये.
​निळ्या रंगाची अॅक्टिव्हा दुचाकी मोपेड (आर.टी.ओ. क्रमांक- एम.एच. १२/व्ही.आर./६४७४): राजगड पोलीस स्टेशन (गु.र.नं. १८५/२०२६), किंमत ८०,०००/- रुपये.
​रिक्षा (क्रमांक- एम.एच. १४/जी.सी./७१२६): काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे (गु.र.नं. २१९/२०२६), किंमत २,५०,०००/- रुपये.
​हिरो स्प्लेंडर दुचाकी (आर.टी.ओ. क्रमांक- एम.एच. १२/जे.आर./९६६३): काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे (गु.र.नं. २९२/२०२६), किंमत ६०,०००/- रुपये.
​या कारवाईमध्ये विधीसंघर्षित बालकाकडून एकूण तीन दुचाकी, एक रिक्षा आणि एक मोबाईल फोन असा एकूण ४,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.
​मार्गदर्शन व पोलीस पथक:
​सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर श्री. जीवन बेनीवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्री. अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काळेपडळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार पार पाडण्यात आली.
​या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे व गिरीराज जगदाळे यांनी सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार | पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा. पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

error: Content is protected !!