Homeताज्या बातम्याकोंढव्यात घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; पोलिसांकडून २ लाख ९०...

कोंढव्यात घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; पोलिसांकडून २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे :
कोंढवा खुर्द, येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील सराईत आरोपीला पुणे पोलिसांनी मोठ्या चलाखिने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एकूण २,९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी:
​कोंढवा खुर्द, पुणे येथील स्वारंगी हाईट्स, टिळेकरनगरमधील फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात तीन इसमांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरफोडी केली आणि एकूण ४,७०,००० रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी कोंढवा खुर्द, येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​पोलिसांचे पथक आणि कसून तपास:
​सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दिपक कारंडे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पोलीस उप-निरीक्षक आकाश विटे व त्यांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू केला. पुणे शहरात यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींचा डेटा तपासून वर्गीकरण करण्यात आले, तेव्हा हा गुन्हा महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण (वय २१ वर्षे, रा. गाडीतळ, हडपसर, पुणे) याने आपल्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.
​आरोपी अतिशय चाणक्ष बुद्धीचा असून पोलिसांपासून वाचण्यासाठी मोबाईल वापरत नव्हता तसेच नेहमी पेहराव बदलून व चेहरा लपवून राहत असल्याने त्याचा शोध घेणे अत्यंत अवघड होते.
​सापळा रचून नाट्यमय पकड:
​आरोपी १७ जुलै २०२६ रोजी गोकुळनगर लेन नंबर ०३ येथील शिवतेज गणपती मंदिराच्या जवळ रात्री २०.०० ते २२.०० वाजेच्या सुमारास कोणालातरी भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विजय खेंगरे यांना मिळाली.
​मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने संबंधित भागात रस्त्यालगत पार्क केलेल्या गाड्यांमध्ये सापळा रचला. रात्री नऊच्या सुमारास आरोपी पेहराव बदलून, तोंडाला मास्क लावून पॅसेंजर रिक्षाने मेन रोडवर उतरून गोकुळनगर लेन नंबर ०३ मध्ये येत असताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो धक्काबुक्की करून सुमारे २ किलोमीटरपर्यंत पळून गेला आणि एका चालू बांधकामाच्या इमारतीत लपून बसला. पोलिसांनी संपूर्ण बिल्डिंगचा सर्च घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने बिल्डिंगवरून पुन्हा उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले.
​चौकशी आणि उघड झालेले गुन्हे:
​पोलिसांनी नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण (वय २१ वर्षे, रा. हडपसर, पुणे) असल्याचे सांगितले. त्याच्याकडे घरफोडीबाबत सखोल चौकशी केली असता त्याने स्वारंगी हाईट्स, कोंढवा खुर्द येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
​तपासादरम्यान त्याने खालीलप्रमाणे इतर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले:
​वाघजाई अपार्टमेंन्ट फ्लॅट नंबर २०१, वाघजाई मंदिराजवळ, सोपानकाकानगर, कात्रज, पुणे येथे घरफोडी चोरी.
​अकृती हपटाऊन कंट्री उड्स, टिळेकरनगर येथून यामाहा कंपनीची मॉडेल MT 15 V2 (BXF1) मोटारसायकल चोरी.
​हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरीराविरुद्धचा गुन्हा करून फरार असणे.
​पोलिसांनी त्याच्याकडून एकूण २,९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्याविरुद्ध खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:
१. कोंढवा खुर्द, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे (गु.र.नं. ८४/२०२६).
२. कोंढवा खुर्द, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. १०४/२०२६).
३. हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर (गु.र.नं. ४५७/२०२६).
४. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे (गु.र.नं. ३६५/२०२६).
​मार्गदर्शन व कारवाई करणारी टीम:
​सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०५, पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दिपक कारंडे यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार आकाश विटे (पोलीस उप-निरीक्षक), अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयुर मोरे व सुजित मदन यांनी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले ४ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक...

पुणे शहर आयुक्तालयात विनापरवाना शस्त्र बाळगणारे, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!