Homeताज्या बातम्यापुणे महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप: पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा; क्रांती...

पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप: पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा; क्रांती मजदूर सेनेचे बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या नगररोड, येरवडा आणि ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप **’क्रांती मजदूर सेना (महाराष्ट्र राज्य)’**चे संस्थापक/अध्यक्ष मा. अर्जुनभाऊ ओहोळ यांनी केला आहे. या प्रकरणाची कोणतीही चौकशी न झाल्यामुळे प्रशासनाविरोधात दि. २२/०७/२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
​कामांचे स्वरूप व भ्रष्टाचाराचे आरोप
​प्राप्त माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या नगररोड, येरवडा आणि ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात रस्त्यावरील चेंबर्स समपातळीत करणे, आरसीसी चेंबर्स करणे, क्षेत्रीय कार्यालयनिहाय मोबाईल मेन्टेनन्स युनिटद्वारे देखभाल दुरुस्तीची कामे करणे आणि ततषंगिक इतर कामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या आसपास कामे काढण्यात आली होती.
​मात्र, या सर्व प्रक्रियेत नियमावलीला पूर्णपणे बाजूला सारून, तीन्ही क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि परिमंडळ-१ चे तत्कालीन उपायुक्त श्री. माधव जगताप यांनी विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेवूनच संपूर्ण प्रक्रिया राबवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या मनमानी कारभारामुळे पुणे महापालिकेच्या प्रत्येक कामात अंदाजे २० ते ३० लाख रुपयांचे, म्हणजेच एकूण करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. या गंभीर प्रकरणाची तक्रार क्रांती मजदूर सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाला दि. ४/६/२०२६ रोजी निवेदनाद्वारे देण्यात आली होती.
​नागरिकांचे हाल व प्रशासनाचे दुर्लक्ष
​पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांमध्ये प्रामाणिकपणा न दाखविल्यामुळे किंवा कामे योग्य प्रकारे न केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अत्यंत भीषण संकटाचा सामना करावा लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, या भागातील कित्येक नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी गुडघ्याभर तर काही ठिकाणी छातीएवढ्या पाण्यात उतरून जावे लागले होते.
​पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांमध्ये झालेल्या या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार वृत्तपत्रांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानाही पुणे महापालिकेने किंवा प्रशासनाने या निवेदनाच्या अनुषंगाने क्रांती मजदूर सेनेला आजतागायत कोणत्याही प्रकारची माहिती, स्पष्टीकरण किंवा कारवाईची माहिती दिलेली नाही.
​आंदोलनाचा इशारा व प्रमुख मागण्या
​प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे आणि कसल्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे, क्रांती मजदूर सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर दि. २२/०७/२०२६ रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या संपूर्ण आंदोलनाची आणि प्रकरणाची गंभीर नोंद पुणे महानगरपालिका महापौर आणि आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी घ्यावी, अशी आक्रमक भूमिका संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मा. अर्जुनभाऊ ओहोळ यांनी घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद

पुणे, १५ सप्टेंबर २०२६: पुणे शहर पोलीस दल आणि खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्याखाली मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या...

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

error: Content is protected !!