येरमाळा (ता. कळंब, जि. धाराशिव): येरमाळा येथील येडशी रोडवरील पेट्रोल पंपासमोरील ‘चंद्रकांत स्टील वर्क्स’ या दुकानात जानेवारी २०२५ पासून ते जुलै २०२६ पर्यंत वारंवार चोऱ्या झाल्या असून, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप अर्जदार श्री. चंद्रकांत किसन कळसाईत (रा. येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव, यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी ३०/०७/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक, येरमाळा पोलीस स्टेशन (ता. कळंब, जि. धाराशिव) यांना तसेच ०५/१०/२०२६ रोजी पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव (आवक लिपीक, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव) यांना लेखी अर्ज देऊन घटनास्थळाची पाहणी, पंचनामा, चोरट्यांचा शोध आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्जातील प्रमुख घटनाक्रम व मुद्दे
पहिली चोरी (१ जानेवारी २०२५): दुकानातील मागील पत्रा काढून कामाचे साहित्य चोरीस गेले. त्यावेळी अंदाजे ७० ते ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचा अर्ज पोलीस ठाण्यात देण्यात आला होता. पोलिसांनी शहानिशा केली, मात्र कोणतीही दखल घेतली नाही.
दुसरी चोरीचा प्रयत्न (२ मार्च २०२६): पहाटे ४ च्या सुमारास चंद्रकांत किसन कळसाईत स्वतः दुकानात झोपले असताना चोर वरून पत्रा काढून आत येत असताना त्याने बॅटरी दाखवली. तोंडावर उजाड पडल्याने आणि कळसाईत यांना पाहून चोर पळून गेला. याबाबत पोलिसांना (जमादार साहेब) सांगितल्यानंतर त्यांनी टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली.
तिसरी चोरी (३ मे २०२६): दुकानाचा मागील पत्रा काढून मोठमोठे सामान, गिऱ्हाइकाचे सामान, नांगराचे सॉफ्ट व इतर सामान चोरीस गेले. या चोरीत अंदाजे ९० हजार रुपये किमतीचा माल गेल्याचे नमूद केले असून, या प्रकरणाचीही पोलिसांनी दखल घेतली नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचाली व नुकसान (२९/०७/२०२६): दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून एक महिना झाल्यानंतर २९/०७/२०२६ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी मोटारसायकलवरून येऊन दुकानासमोर कॅमेरा दिसताच मोटारसायकल सोडून पळ काढण्यात आला व ५ मिनिटांनी मोटारसायकल घेऊन चोरटा गेला. त्याच दिवशी रात्री ११.२० वाजता दुकानामागे कॅमेऱ्यात मोटारसायकल चालविणारा दिसला. कॅमेऱ्यावर ४ ते ५ दगड मारून कॅमेऱ्याचे तोंड वळविण्यात आले आणि पत्रा काढण्याचा प्रयत्न सुरू केला. कळसाईत यांच्या आवाजाने दोघे पळून गेले.
एकूण नुकसान व पुरावे: आजपर्यंत दुकानातून १ लाख ९० हजार रुपये किमतीचे सामान चोरी गेल्याचे नमूद आहे. कॅमेऱ्यात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांचे स्पष्ट चेहरे दिसले असून, मागील कॅमेऱ्यावर दगड मारून त्याचेही नुकसान करण्यात आले. २९/०७/२०२६ रोजी दुपारी ३.३० वा. व रात्री ११.२० वा. चे चोरट्यांचे फोटो व सीसीटीव्ही फुटेज पोलीस स्टेशनला सादर करण्यात आल्याचे अर्जात म्हटले आहे (अर्जासोबत दोन फोटो जोडल्याची नोंदही दिसून येते).
न्याय व कारवाईची मागणी
अर्जदार चंद्रकांत किसन कळसाईत यांनी पोलीस निरीक्षक (येरमाळा पोलीस स्टेशन) आणि पोलीस अधीक्षक (धाराशिव / एस. पी. साहेब) यांच्याकडे घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करावा, सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांच्या आधारे चोरट्यांना पकडून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी आणि आपल्याला न्याय द्यावा, अशी नम्र विनंती केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























