पुणे : भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या आंतरजातीय विवाहतून झालेल्या हत्ये नंतर आंबेडकरी चळवळीमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी भोर तहसील कार्यालयावर जवळपास हजारो लोकांच्या उपस्थितीत निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल डंबाळे यांचे सह प्रवीण ओव्हाळ, बाळासाहेब अडसूळ, नवनाथ गायकवाड इत्यादींच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट घेतली असता सदर प्रकरणी राज्य सरकार व जिल्हा पोलीस प्रशासन गंभीर असून आंदोलकांच्या मागणीच्या नुसार या प्रकरणी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाला पोलिस आधीक्षकांनी दिली. या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये व त्यांना कोणतीही भीतीचे वातावरण वाटू नये यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबीयांना 24 तास पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढण्यात आल्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले. तसेच आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही घटना होऊ नये यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी सांगितलेरिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी सांगितले यावेळी ते बोलताना म्हणाले की 22 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असून ते याप्रकरणी योग्य तो न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी देखील बोलणार आहेत.
अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने प्रकरणाला सामोरे जायला हवे व यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्राथमिक तपास योग्य करण्यासाठी पोलिसांच्या सोबत काम केले पाहिजे अशी भूमिका डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडली.
दरम्यान, अलीकडच्या काळात वाढत असलेल्या ऑनर किलिंग च्या घटनांमुळे तरुणांमध्ये मोठी भीती व संतापाची भावना असून सरकारने ऑनर किलिंग विरोधी कायदा तात्काळ करावा अशी मागणी राहुल डंबाळे यांनी केली.
(टिप वरील माहिती काही वाचलेल्या बाबींच्या आधारे देण्यात आलेली आहे. यातून क्राईम महाराष्ट्र लाईव्ह कोणताही दावा करत नाही.)

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























