पुणे-मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने औंध येथील मुरकुटे प्लाझा येथे छापा टाकून हाय प्रोफाइलचा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या छाप्यात युनिट चारच्या पथकाने महाराष्ट्रातील चार, गुजारातमधील एक आणि थायलंड देशातील चार महिलांची सुटका केली.याप्रकरणी स्पा मालक, मॅनेजर, कॅशिअर तसेच मध्यस्थी करणार्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणार्या रिकबुल हुसेन आबुल हुसेन (वय 26, रा. मुळ बेरबेरी रोड, आसाम) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहायक निरीक्षक नरेंद्र पाटी, उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.