Homeताज्या बातम्याPMC समोरच शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक तिरका; नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन केला...

PMC समोरच शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक तिरका; नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन केला सरळ

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा फलक तिरका झाल्याची धक्कादायक बाब पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात समोर आली आहे. विशेष म्हणजे हा फलक पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोरच असतानाही संबंधित प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले हे या मार्गावरून ये-जा करत असताना त्यांनी हा तिरका झालेला फलक वारंवार पाहिला. सुरुवातीला पालिकेकडून तातडीने दुरुस्ती केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनी स्वतःच पुढाकार घेतला.
आज सचिन भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित फलक सरळ करून स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ केला. यावेळी हितेश पाटोळे, अनिकेत गंगावणे, कैलास गोंधळे आणि नंदू राक्षे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. फलक तात्पुरता स्थिर राहावा यासाठी खालच्या बाजूस दगड लावून त्यास आधार देण्यात आला.
यासंदर्भात सचिन भोसले यांनी ऑनलाईन तक्रारही दाखल केली असून त्यांनी सांगितले की,
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा फलक तिरका असणे अत्यंत दुर्दैवी आहे. महापुरुषांच्या नावाचा मान राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन हा फलक कायमस्वरूपी व्यवस्थित बसवावा.”
तसेच त्यांनी इशारा दिला की, भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा आढळल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
ही घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, नागरिकांनाच मूलभूत नागरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बापुसाहेब गानला यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान; वानवडीत मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा थाटात संपन्न

पुणे, दि. २८ जून २०२६: पुणे कॅन्टोन्मेंट कल्चरल असोसिएशन, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, तसेच सिद्धार्थ ग्रंथालय आणि वाचनालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला...

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या झाल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

‘कस्टडी कबुलीजबाब पुरावा म्हणून मान्य नाही’: केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयलचे वकील. पुणे...

पुणे : केतन अग्रवाल खून खटल्यातील आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी रविवारी असा युक्तिवाद केला की, पोलिस कोठडीत असताना दिलेली कोणतीही कबुली पुरावा...

महाविद्यालये SPPU कडून स्पष्टतेची वाट पाहत असल्याने NEP 4थ्या वर्षाच्या सन्मान प्रवेशांना विलंब होतो....

प्रतिनिधित्व हेतूसाठी चित्र पुणे : द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवीपूर्व वर्ग जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) चार...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

error: Content is protected !!