Homeताज्या बातम्याओळखीचा विश्वासघात – आर्मीतील माजी जवानाकडून ४.२६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने...

ओळखीचा विश्वासघात – आर्मीतील माजी जवानाकडून ४.२६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी

ओळखीचा विश्वासघात – आर्मीतील माजी जवानाकडून ४.२६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी

पुणे – ओळखीचा गैरफायदा घेत माजी आर्मी जवानाकडून स्वतःच्या नातेवाईक महिलेच्या घरातून तब्बल ₹४.२६ लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. २६०/२०२५ भा. दं. सं. २०२३ च्या कलम ३०५ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सौ. सुवर्णा मायप्पा मोटे (वय ३५ वर्षे, धंदा – गृहीणी, रा. स. नं. ७/२९, बालाजीनगर, गल्ली नं. ४, घोरपडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, त्या आपल्या मुलासह नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या दरम्यान अज्ञात इसमाने त्यांच्या घराची चावी वापरून बेडरूममधील लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस नेले.

फिर्यादींचे पती हे आर्मीमध्ये नोकरीनिमित्त सध्या चेन्नई येथे कार्यरत आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

तपास पथकाने घटनास्थळावरील CCTV फुटेजची पडताळणी, संशयित इसमांचे मोबाईल CDR व SDR तपासणी, आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संदीप सुरेश चव्हाण (रा. साईसिद्धी कॉलनी, आदर्शनगर, जयमहाराष्ट्र कॉलनी समोर, घर क्र. ९०९, दिघी, पुणे) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपी हा फिर्यादींचा नातेवाईक असून, तो देखील यापूर्वी आर्मीमध्ये फिर्यादींच्या पतीसोबत नोकरीला होता. घरात कोणी नसल्याची माहिती मिळवून आरोपीने ओळखीचा विश्वासघात करत चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

यानंतर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता आरोपीला अटक करण्यात आली.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ५) श्री. राजकुमार शिंदे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, तसेच सपोफो राजु कदम, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, राहुल मोरे, शिवाजी धांडे, पोलीस अंमलदार रुपेश तोडेकर, अक्षय धुमाळ आणि स्वप्नील रासकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिना उलटला, मंत्र्याने कृषी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. पुणे बातम्या

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून 14 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कृषी...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे. पुणे बातम्या

पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

error: Content is protected !!