Homeक्राईमकुठे गेली सीमा भिंत? – कोसळलेल्या भिंतीसोबत नागरिकांचा विश्वासही कोसळतोय!

कुठे गेली सीमा भिंत? – कोसळलेल्या भिंतीसोबत नागरिकांचा विश्वासही कोसळतोय!

कुठे गेली सीमा भिंत? – कोसळलेल्या भिंतीसोबत नागरिकांचा विश्वासही कोसळतोय!

पुणे – पुणे शहराच्या हृदयात, नवी पेठ येथील आनंद बाग फाटक, बाग सोसायटी, वैकुंठ परिसरातील नागरिक आज जणू काही आपल्या नशिबावर सोडले गेले आहेत. आंबील ओढ्याच्या दोन्ही बाजूंना असणारी सीमा भिंत अनेक ठिकाणी कोसळली आहे आणि अनेक ठिकाणी तर अजून उभीच नाही!

पावसाळा डोक्यावर येऊन ठेपला आहे. जर अजून एक मुसळधार पाऊस झाला, तर या भागातील घरांमध्ये पाणी घुसणे, मालमत्तेचे नुकसान होणे, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचे जीव धोक्यात येणे – ही शक्यता अजिबात टाळता येणार नाही.
प्रश्न असा आहे – या परिसरात राहणाऱ्यांचा जीव इतका स्वस्त आहे का?

राजकारण बाजूला ठेवा – इथे माणसाचा जीव महत्त्वाचा आहे!

ही तक्रार आज माझी नाही – ती प्रत्येक आईची आहे जिने आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड चालवली आहे.
ती त्या ज्येष्ठ नागरिकाची आहे ज्याला रस्त्यावर पडलेल्या सीमाभिंतीच्या ढिगाऱ्यातून वाट काढावी लागते.
ती त्या मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे ज्यांनी आयुष्याची पुंजी लावून घरे घेतली, आणि आता प्रत्येक पावसाळा म्हणजे त्यांच्यासाठी एक संकट!

खासदार मोहोळ यांनी प्रयत्न केले, मग निधी कुठे अडला?

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आंबील ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी शासन निर्णय (जीआर) मिळवून दिला होता. तो पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे देतानाही भाजपचे संपूर्ण नेतेमंडळ उपस्थित होते.

मग प्रश्न असा आहे –
त्या निधीचं काय झालं?
त्या २०० कोटी रुपयांचं काय?
पैसे आले नाहीत की आले पण वापरले गेले नाहीत?
किंवा फक्त घोषणा करून लोकांना फसवण्यात आलं?

प्रभाग क्र. २९ – नेते बलाढ्य, पण नागरिक वंचित!

या प्रभागात भाजपचे अनेक मोठे पदाधिकारी आहेत – सभागृह नेते, उपमहापौर, समित्यांचे अध्यक्ष. पण ज्यांच्या सत्तेच्या बळावर हे पद मिळालं, ते सामान्य नागरिक आजही विकासासाठी, सुरक्षिततेसाठी, स्वच्छतेसाठी, आरोग्याच्या प्रश्नांसाठी झगडत आहेत. ही शोकांतिका आहे.

शेवटी फक्त एवढंच सांगावंसं वाटतं –

आपण पक्षासाठी नाही, माणसासाठी मतदान करा.
आपल्या परिसरात फुलं वाटणाऱ्या नाही, संकटात हात देणाऱ्या व्यक्तीची निवड करा.
आपल्या लेकरांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या पुण्यासाठी विचार करा.

( स्थळ- आनंद बाग सोसायटी, फाटक बाग, वैकुंठ जवळ नवी पेठ पुणे. )
———————

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत आहे. पुणे...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

error: Content is protected !!