Homeताज्या बातम्याकोथरुडमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई

कोथरुडमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई

पुणे :
पौड फाट्या परिसरातील एका घरात चोरी करणाऱ्या चोरट्यास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.
​दिनांक १९ जुलै २०२६ रोजी अलंकार पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मधील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे व शिवाजी सातपुते करत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित गद्रे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा करणारा इसम भंगार गोळा करण्याचे काम करतो.
​मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिसांनी वसंतनगर, केळेवाडी, कोथरुड येथील राहत्या घरातून सोमनाथ भगवान मोरे (वय ३२ वर्षे, रा. वसंतनगर, विटेकर फॅब्रिकेशनजवळ, केळेवाडी, कोथरुड, पुणे) यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने १७ जुलै २०२६ रोजी पौड फाट्याजवळील विघ्नहर कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावरील घरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
​आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या ११,५००/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह त्याला पुढील कार्यवाहीकरिता अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
​ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे ३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे व शिवाजी सातपुते यांच्या पथकाने पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

बाणेर वक्फ जमीन विवाद: वक्फ बोर्डाच्या निर्णयाचे ‘मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन’कडून स्वागत

​पुणे: बाणेर येथील बहुचर्चित वक्फ जमिनीच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे 'मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन' (Miss Farha Charitable Foundation) ने स्वागत...

मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद

पुणे, १५ सप्टेंबर २०२६: पुणे शहर पोलीस दल आणि खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्याखाली मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या...

error: Content is protected !!