पुणे, दि. 01 एप्रिल 2026 — नऱ्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
दि. 30 मार्च 2026 रोजी नऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एक इसम शस्त्रासह परिसरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित इसमास ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीचे नाव अमोल पद्माकर सोनवणे (वय 24 वर्षे) असे असून तो आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी, पुणे येथे राहणारा आहे. त्याच्याकडून एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नऱ्हे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 195/2026 अन्वये आर्म्स अॅक्ट कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बन्सोडे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 श्री. संभाजी कदम, तसेच सहायक पोलीस आयुक्त श्री. अजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार संजय शिंदे, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोळे, शाहू राठोड व इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























