Homeक्राईमपहाटेच्या वेळी वर्धमान ज्वेलर्समध्ये जबरी चोरी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास!

पहाटेच्या वेळी वर्धमान ज्वेलर्समध्ये जबरी चोरी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास!

राहुरी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी, शिवाजी चौकात असलेल्या वर्धमान ज्वेलर्स या दुकानात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुकानाचे मालक श्री. राजेंद्र भन्साळी हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांनी पाहिले की दुकानाचे कुलूप सुस्थितीत होते, मात्र कोंडा तोडून चोरी केली गेली होती. परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी भन्साळी कुटुंबीयांना याची तत्काळ माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगें यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की, चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केले होते आणि कुलूप न तोडता फक्त कोंडा तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातून प्रामुख्याने चांदीचे दागिने चोरले.

दुकानमालक राजेंद्र भन्साळी यांच्यासोबत त्यांचे पुत्र गौरव भन्साळी व सौरभ भन्साळी यांनी मिळून चोरी गेलेल्या ऐवजाची पाहणी केली आहे.

घटनास्थळी परिसरातील अनेक सराफ व्यावसायिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मुख्य बाजारपेठेतील सुरक्षा असूनही अशी घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन नागरिकांना व व्यापाऱ्यांना देण्यात आले आहे.

📞 संपर्क – उपसंपादक शिवाजी दवणे – 9730170965
📰 Crime Maharashtra Live News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

error: Content is protected !!