“पालखी परंपरा वाचवण्यासाठी भवानी पेठेत एकजूट — मनपा आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद”
पुणे, दि. २४ एप्रिल :
शेकडो वर्षांची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या पालखी सोहळ्याच्या विश्रांती स्थळाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील सर्व मंडळांनी एकत्र येत ठोस भूमिका घेतली आहे.
शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी सर्व मंडळांच्या प्रतिनिधींनी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची भेट घेऊन पालखीच्या पारंपरिक मुक्काम स्थळात कोणताही बदल करू नये, या मागणीचे निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाही आयुक्तांनी वेळ देऊन सभागृहाबाहेर येत प्रतिनिधींची भेट घेतली व निवेदन स्वीकारले.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आयुक्तांनी येत्या आठवड्यात भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिरात प्रत्यक्ष भेट देऊन सर्व मंडळांशी सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी नाना पेठ व भवानी पेठ परिसरातील एकूण २१ मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. सर्व मंडळांनी एकमताने पालखीच्या पारंपरिक मुक्काम स्थळाचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ही चळवळ आता अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आयुक्तांसोबत होणाऱ्या आगामी बैठकीस सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, पालखी संदर्भातील स्थानिक समस्या, हरकती व सूचना मांडून परंपरा जपण्यासाठी एकजुटीने भूमिका मांडण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिर हे पालखीचे पारंपरिक विश्रांती स्थळ असून ही परंपरा अखंड राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनानेही या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यामुळे सर्व मंडळांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























