पुणे क्राईम ब्रांचची कारवाई: बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा, १.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि. ०६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (युनिट २) विमाननगर परिसरात मोठी कारवाई करत बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकून सुमारे ₹१,७४,५५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पथक पेट्रोलिंग करत असताना विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला.
या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
स्वप्निल शांताराम तांबे (वय ३२)
अमेय मुकेश अंजिरे (वय २८)
नवसाजी विठ्ठलराव कोल्हे (वय २८)
अमितकुमार दयालजी गोयल (वय २६)
कमल इस्लाम शेख (वय २६)
शिवमकुमार श्रीराम यादव (वय २३)
माहेरफ अफताबुद्दीन आलम (वय १८)
पोलिसांनी आरोपींकडून हुक्का पॉट, विदेशी तंबाखू, विविध साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ₹१,७४,५५०/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
📌 क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
आपल्या परिसरातील गुन्हे, कारवाई आणि ब्रेकिंग न्यूजसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























