Homeताज्या बातम्यापुणे गुन्हे शाखा युनिट ७ ची मोठी कारवाई; वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील...

पुणे गुन्हे शाखा युनिट ७ ची मोठी कारवाई; वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील १ आरोपी व ३ विधीसंघर्षित बालक ताब्यात

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेत गुन्हे शाखा युनिट ७ ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ आरोपी व ३ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास, वाघोली लोणीकंद रोडवरील मोरया फॅशन गल्ली, वाघोली, पुणे येथे चार अज्ञात इसमांनी वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व गुन्हे शाखा युनिट ७ चे पथक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते.

तपासादरम्यान पोलिस अंमलदार नितीन धाडगे यांना गुप्त माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित इसम जय जवान वस्ती, भावडी रोड, वाघोली येथे आले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट ७ च्या पथकाने तात्काळ छापा टाकून संशयित चार इसमांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाघोली लोणीकंद रोडवरील मोरया फॅशन गल्ली, वाघोली येथे वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४), ३(५) व मुंबई पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अमित प्रकाश काकडे (वय २२ वर्षे, रा. लेन नंबर २, साई पार्क, गणेश मंदिराजवळ, रायसोनी कॉलेज, वाघोली, पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह ३ विधीसंघर्षित बालकांना पुढील तपासासाठी वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. प्रवीण देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. प्रजक्त मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सागर ढवळे, निलेश सालवे, विनायक सालवे, निनाद लोंढे, ऋषिकेश ताकवणे व नितीन धाडगे यांनी ही उल्लेखनीय कारवाई पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास | पुणे बातम्या

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मॉडर्न कॉलेजमध्ये ११ वी विज्ञान शाखेत गुंजन वाघमारे प्रथम, ९३ टक्के गुणांनी यश

पुणे, प्रतिनिधी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या परीक्षेत गुंजन संतोष वाघमारे...

खराडी पोलिसांची मोठी कारवाई : ५ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद, चार गुन्ह्यांचा उलगडा

पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ : खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला पोलिसांनी जाळ्यात अडकवत मोठी कारवाई केली आहे. या...

पुणे : मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात चंदननगर पोलिसांची मोठी कारवाई; ४८ तासांत आरोपी जेरबंद, ६६...

पुणे शहरातील चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या मोबाइल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक करून तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल...

error: Content is protected !!