पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या नगररोड, येरवडा आणि ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप **’क्रांती मजदूर सेना (महाराष्ट्र राज्य)’**चे संस्थापक/अध्यक्ष मा. अर्जुनभाऊ ओहोळ यांनी केला आहे. या प्रकरणाची कोणतीही चौकशी न झाल्यामुळे प्रशासनाविरोधात दि. २२/०७/२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
कामांचे स्वरूप व भ्रष्टाचाराचे आरोप
प्राप्त माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या नगररोड, येरवडा आणि ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात रस्त्यावरील चेंबर्स समपातळीत करणे, आरसीसी चेंबर्स करणे, क्षेत्रीय कार्यालयनिहाय मोबाईल मेन्टेनन्स युनिटद्वारे देखभाल दुरुस्तीची कामे करणे आणि ततषंगिक इतर कामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या आसपास कामे काढण्यात आली होती.
मात्र, या सर्व प्रक्रियेत नियमावलीला पूर्णपणे बाजूला सारून, तीन्ही क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि परिमंडळ-१ चे तत्कालीन उपायुक्त श्री. माधव जगताप यांनी विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेवूनच संपूर्ण प्रक्रिया राबवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या मनमानी कारभारामुळे पुणे महापालिकेच्या प्रत्येक कामात अंदाजे २० ते ३० लाख रुपयांचे, म्हणजेच एकूण करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. या गंभीर प्रकरणाची तक्रार क्रांती मजदूर सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाला दि. ४/६/२०२६ रोजी निवेदनाद्वारे देण्यात आली होती.
नागरिकांचे हाल व प्रशासनाचे दुर्लक्ष
पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांमध्ये प्रामाणिकपणा न दाखविल्यामुळे किंवा कामे योग्य प्रकारे न केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अत्यंत भीषण संकटाचा सामना करावा लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, या भागातील कित्येक नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी गुडघ्याभर तर काही ठिकाणी छातीएवढ्या पाण्यात उतरून जावे लागले होते.
पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांमध्ये झालेल्या या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार वृत्तपत्रांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानाही पुणे महापालिकेने किंवा प्रशासनाने या निवेदनाच्या अनुषंगाने क्रांती मजदूर सेनेला आजतागायत कोणत्याही प्रकारची माहिती, स्पष्टीकरण किंवा कारवाईची माहिती दिलेली नाही.
आंदोलनाचा इशारा व प्रमुख मागण्या
प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे आणि कसल्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे, क्रांती मजदूर सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर दि. २२/०७/२०२६ रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या संपूर्ण आंदोलनाची आणि प्रकरणाची गंभीर नोंद पुणे महानगरपालिका महापौर आणि आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी घ्यावी, अशी आक्रमक भूमिका संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मा. अर्जुनभाऊ ओहोळ यांनी घेतली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























