Homeताज्या बातम्यापुणे शहरात १८ कोटींच्या सोन्याच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीस अटक; खंडणी विरोधी पथकाची...

पुणे शहरात १८ कोटींच्या सोन्याच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीस अटक; खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ यांनी मोठी कारवाई करत पुण्यातील एका प्रसिद्ध सराफाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून या प्रकरणामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाने मार्च २०२६ मध्ये वार्षिक ऑडिट कामी स्टॉक व्हेरिफिकेशन केले असता, त्यामध्ये सुमारे ५२,८०० ग्रॅम वजनाचे सोने आणि सुमारे १७,००० ग्रॅम चांदी यामध्ये फरक आढळून आला. या प्रकारानंतर संबंधितांनी विश्वासात घेत तपास सुरू केला असता दुकानात काम करणारा प्रशांत कांतीलाल बंबेचा (वय ५६ वर्षे, रा. फ्लॅट नं. १००४, ए बिल्डिंग, शांतिनगर सोसायटी, कोंढवा पुणे) याच्यावर संशय निर्माण झाला.

तपासात पुढे उघड झाले की, प्रशांत बंबेचा याने दुकानातील विश्वासाचा गैरफायदा घेत सोने व चांदीची चोरी केली आणि त्याची विक्री करून स्वतःकडे मोठी रक्कम जमा केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक १५७/२०२६ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१, ३९६, ४०६, ४२० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासादरम्यान आणखी दोन आरोपींचा सहभाग समोर आला असून त्यामध्ये
समाकांत महादेव पाटोळे (वय ५२ वर्षे, रा. केडगाव जि. अहमदनगर)
मधु उर्फ महेश समाकांत पाटोळे (वय २२ वर्षे, रा. केडगाव जि. अहमदनगर)
यांचा समावेश आहे. या आरोपींनीही या गुन्ह्यात सहकार्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्याचा तपास करताना खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केडगाव (जि. अहमदनगर) येथे छापा टाकून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी प्रशांत बंबेचा हा मागील दीड महिन्यांपासून इतर आरोपींसोबत राहत असल्याचेही निष्पन्न झाले. �

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एकूण ५,४६,८२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये
२ किलो ५५२ ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे ३,७०,९२,०००/- रुपये)
२,३०,०००/- रुपये किंमतीचा वापरता मोबाईल फोन
१,३०,०००/- रुपये किंमतीची मर्सिडीज बेंझ कार
८,०००/- रुपये रोख रक्कम
असा समावेश आहे. �

सदर कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. �

ही कारवाई पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना कासारे, पोलीस उपनिरीक्षक अजित पवार, पोलीस अंमलदार अनिल कुरणेसकर, किरण पडळकर, अभिज्ञान येडे, नितीन मुंडे, कांबळेकर कोंडे, आसाब पठाण, प्रशांत शिंदे, संदीप मिंधे, महिला पोलीस अंमलदार मृदुला लामाडे, तसेच प्रतिक्षा पवार व सुवर्णा धुमाळ यांनी संयुक्तरित्या केली. �

सदर प्रकरणाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!