पुणे-शिरूर महामार्गाचा ‘हाय-टेक’ कायापालट; ६-लेन उन्नत मार्ग आणि मेट्रो एलिव्हेटेड मार्गासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके तसेच प्रशासकीय यंत्रणा ‘ॲक्शन मोड’वर!
शिरूर-हवेली मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा शाप कायमचा पुसून टाकण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके यांच्या संकल्पनेतील ‘पुणे-शिरूर महाप्रकल्प’ आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. आज वाघोली येथे सर्व संबंधित शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत पुणे ते शिरूर एलिव्हेटेड महामार्ग तसेच रामवाडी ते वाघोली मेट्रो ६-लेन एलिव्हेटेड महामार्गाची संयुक्त ‘मैदानी’ पाहणी केली. या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास आता केवळ वेगवानच नाही, तर जागतिक दर्जाचा होणार आहे.
पुणे-शिरूर राष्ट्रीय महामार्ग (NH-753F) हा आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना ठरणार आहे.या मार्गावर खालच्या स्तरावर ६-लेनचा एलिव्हेटेड (उन्नत) रस्ता असेल, तर त्याच्या वरच्या स्तरावर रामवाडी ते वाघोली अशी मेट्रो धावणार आहे. या मेट्रो मार्गासाठी सुमारे ३६६६.२४ कोटी तसेच ५३.४० किमी लांबीच्या या ६-लेन महामार्गासाठी ७,५१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो BOT (Build-Operate-Transfer) पद्धतीने राबविला जाणार आहे. अनेक अंडरपास, स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र ‘एक्झिट’ मार्ग आणि ६-लेनचा भव्य रस्ता यामुळे वाघोलीसह संपूर्ण शिरूर-हवेलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. अडचणींवर जागेवरच तोडगा
केवळ कागदावर नियोजन न करता, प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू करताना येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी आमदारांनी सर्व विभागांना एकाच छताखाली आणले. या दौऱ्यात खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ व त्यांच्या टीमने रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाची तांत्रिक पाहणी केली. मेट्रो आणि उन्नत मार्गाचे खांब (Pillars) कसे असतील, याचा आराखडा निश्चित करण्यात आला. वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्याशी चर्चा करून प्रकल्प सुरू असताना पर्यायी मार्गांचे आणि सिग्नल यंत्रणेचे नियोजन करण्यात आले, जेणेकरून कामादरम्यान नागरिकांना त्रास होणार नाही. महावितरण, महापारेषण आणि PWD च्या अधिकाऱ्यांनी मार्गातील वीजवाहिन्या, उच्चदाब वाहिन्या आणि इतर पायाभूत सुविधा हलवण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ‘राइट्स ऑफ वे’ (ROW) आणि आवश्यक असणाऱ्या जमिनीबाबत MSIDC व PWD च्या अभियंत्यांनी सद्यस्थितीचा अहवाल सादर केला.
”गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या ऐतिहासिक प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आजच्या संयुक्त पाहणीचा मुख्य उद्देश हाच आहे की, भूसंपादन किंवा तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प रेंगाळू नये. या पाहणीनंतर एक सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्याकडे सादर केला जाईल आणि लवकरच वरिष्ठ पातळीवर अंतिम बैठक घेऊन कामाचा प्रत्यक्ष नारळ फोडला जाईल.”
*— आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके*
प्रकल्पाचे दूरगामी फायदे
या प्रकल्पामुळे शिरूर-हवेली तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला (IT आणि MIDC) मोठी चालना मिळणार आहे. पुणे-अहिल्यानगर मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार असल्याने वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल. प्रशासकीय यंत्रणेच्या या संयुक्त हालचालींमुळे आता पुणे-शिरूर महामार्गाचा कायापालट निश्चित झाला आहे.यां दौऱ्यादरम्यान मेट्रोचे संचालक श्रीम गाडगीळ साहेब, पुणे वाहतूक पोलीस उपआयुक्त श्री. हिम्मत जाधव साहेब, MSIDC चे कार्यकारी अभियंता व त्यांची टीम, PWD चे अभियंता, MSEB चे कार्यकारी अभियंता व त्यांची टीम तसेच महापारेषणचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. तसेच मोठ्या संखेने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























