Homeताज्या बातम्यामहिलांसारखे गाऊन,सलवार कमीज असा वेश परिधान करून कंपनीत चोरी करणाऱ्या दोघा सराईत...

महिलांसारखे गाऊन,सलवार कमीज असा वेश परिधान करून कंपनीत चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे : महिलांसारखे गाऊन,सलवार कमीज असा वेश परिधान करून कंपनीत चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा बंडल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती.ओळख पटू नये म्हणून सराइत चोरट्यांनी महिलांसारखा वेश परिधान केला होता. मात्र सीसीटीव्ही चित्रीकरण आणि गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास करुन दोन सराईत चोरट्यांना अटक करून हा गुन्हा उघडकीस आला.

अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हारको ट्रान्सफाॅर्मर कंपनीत २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी स्वत:ची ओळख लपविण्यासाठी महिलांसारखा वेश परिधान केला होता. कंपनीच्या खिडकीचा गज तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. एका चोरट्याने पिवळा गाऊन आणि दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीज असा वेश परिधान केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. चोरट्यांनी तोंडाला ओढणी आणि स्कार्फ बांधून कंपनीतील खोलीतून तांब्याच्या तारांचे बंडल आणि पट्ट्या चोरुन नेल्या होत्या.२७ ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत कंपनीतील व्यवस्थापकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

वानवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात महिलांसाठी वेश परिधान करुन कंपनीत चोरी करणारे चोरटे सराइत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गोपाळ मदने, अमोल गायकवाड आणि अर्शद सय्यद यांना मिळाली. पोलिसांनी चोरटे अमन शेख आणि मुसा शेख यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा, पट्ट्या, हार्ड डिस्क असा दोन लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील,उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गु्न्हे शाखेचेपोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, अभी चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!