Homeताज्या बातम्या​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड
​पुणे:
मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत पोलिसांना तसेच न्यायालयातील स्टाफला धक्काबुकी करून न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींना मा. न्यायालयाने १०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधा कारावाहाची शिक्षा सुनावली आहे. तसेच नमूद सर्व इसमांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​काय घडली घटना?
आज दिनांक ३०/१०/२०२६ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. १ येथे समर्थ पोलीस ठाणेकडील आर.सी.सी. प्रकरण क्र. ६२६४/२०२५ (महाराष्ट्र शासन वि. प्रशांत नामदेव पवार व इतर, कलम ६९, ३१८(४), ३५६(२), ३५(५)) हे प्रकरण बोर्डावर होते. साधारण ११:५० वाजण्याच्या सुमारास मा. न्यायालयाचे कामकाज चालू असताना म्हणजेच पी.डब्ल्यू.डि.व्हि. १२७/२०२३ ह्या केसमध्ये मा. न्यायालय आदेश पारीत करत असताना कोर्टामध्ये येऊन, समर्थ पोलीस ठाणेकडील आर.सी.सी. प्रकरण क्र. ६२६४/२०२५ मधील फिर्यादी, आरोपी व त्यांचे नातेवाईक यांनी एकमेकांना धक्काबुकी, शिवीगाळ करून पोलिसांना व न्यायालयीन स्टाफला धक्काबुकी केली.
​दंडात्मक व कायदेशीर कारवाई:
सदर झालेल्या प्रकाराबाबत मा. न्यायालयाने आरोपींना दोषी धरून १०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच नमूद सर्व इसमांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम १३२, २६७, १८९(२), १९०, १९१(१)(२), १९४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या प्रकरणातील नमूद व्यक्तींची नावे व पत्ते:
१) नामदेव उमाजी पवार (वय ५९ वर्षे)
२) प्रशांत नामदेव पवार (वय ३२ वर्षे)
३) शांता नामदेव पवार (वय ५२ वर्षे)
४) सोपान विठ्ठल चव्हाण (वय ३३ वर्षे)
(सहाकर्ते/रहाणार: १९७, सर्व्ह नंबर १४/१२०, मोरे वस्ती, चिखली, पुणे)
५) अमित विलास पवार (वय ३२ वर्षे)
६) आशा गोरखनाथ चव्हाण (वय ३१ वर्षे)
(रहाणार: महात्मा फुले नगर, माळी मळा, लोणीकाळभोर)
७) सवित्रा लहु चव्हाण (वय ३८ वर्षे, धंदा- शेत मजुरी)
८) लहू नारायण चव्हाण (वय ४४ वर्षे, धंदा- शेती)
९) प्रांजल लहू चव्हाण (वय २३ वर्षे)
(क्र. ७ ते ९ सर्व राहणार: रामनगर तांडा, ता. माजलगाव, जि. बीड)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त...

पुणे: खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची...

२० वर्षे पोलिसांना हुलकावणी, अखेर कायद्याच्या कचाट्यात! येरवडा पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी परळीतून केली अटक पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या सुमारे २०...

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

error: Content is protected !!