Homeताज्या बातम्यामाजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाला वर्षपुर्ण होते नव्हे तोवर कुख्यात आंदेकर...

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाला वर्षपुर्ण होते नव्हे तोवर कुख्यात आंदेकर टोळीने रचलेला बदल्याचा ‘डाव’ अखेर यशस्वी

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाला वर्षपुर्ण होते नव्हे तोवर कुख्यात आंदेकर टोळीने रचलेला बदल्याचा ‘डाव’ अखेर यशस्वी ठरत बंडू आंदेकरचा जावई तसेच वनराजच्या खूनातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाचा राहत्या घराच्या दारात गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणूकीच्या गर्देत हा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुण्याच्या नाना पेठ व आसपासच्या परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद (वय २२) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. तर, एकजन जखमी झाला आहे. ही घटना नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्सच्या गेटवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. दरम्यान, गोळ्या झाडून आंदेकर टोळीतील आरोपी पसार झाल्याची माहिती आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्याच्या मध्यभागात रात्री साडे नऊच्या सुमारास सोमनाथ गायकवाड तसेच बंडू आंदेकर यांची मोठी मुलगी संजीवनी तसेच तिचा पती जंयत कोमकर, त्याचे भाऊ प्रकाश व गणेश कोमकर यांनी कटरचून गोळ्या झाडत व कोयत्याने सपासप वारकरून खून केल्याची घटना घडली होती. यानंतर पुण्यातील हे खून सत्र पुढेही सुरूच राहिल असे भाकित वर्तवले जात होते. रिप्लाय म्हणून आंदेकर टोळीकडून कोणाचा तरी गेम केला जाईल असे सांगितले जात होते. वर्षानंतर आंदेकर टोळीने खूनाचा बदला म्हणून पहिली गेम ही कोमकर कुटूंबियातील गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद याचा गोळ्या झाडून खून केला.

कोमकर कुटूंबिय नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्स या इमारतीत राहण्यास आहे. शुक्रवारी आठच्या सुमारास गोविंद हा त्याच्या एका मित्रासोबत इमारतीच्या खाली थांबलेला होता. तेव्हा दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी थेट गोविंदवर गोळ्या झाडत त्याचा खून केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. दरम्यान, भर वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला गेल्याने मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली.

आंदेकरांच्या खुनाचा बदला थांबला, पोलिसांनी टोळीचा गेमच उधळला; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

टोळी युद्धातून नातवाचा जीव घेतला

आंदेकर-गायकवाड टोळी युद्धाचा बळी आंदेकर यांचा नातू ठरला गेला आहे. गणेश कोमकर याला बंडू आंदेकर यांची लहान मुलगी आहे. गणेशला दोन मुले आहेत. त्याचा मोठा मुलगा हा गोविंद होता. आंदेकर गँगकडून त्यालाच टार्गेट करण्यात आले आणि त्याचा जीव घेतला गेला.

ऐन विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येला खून

वैभवशाली गणेशोत्सावाच्या विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येला पुण्यात टोळी युद्धातून गोळ्या झाडून खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मध्यभागात यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त असताना हा खून झाला. तर दुसरीकडे तीन दिवसांपुर्वीच आंदेकर टोळीच्या कटाचा सुगावा लागल्याने शस्त्र पुरवणाऱ्या तसेच वॉच ठेवणाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतरही आंदेकर टोळीकडून गेम सक्सेस केला असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ लागेल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिना उलटला, मंत्र्याने कृषी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. पुणे बातम्या

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून 14 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कृषी...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे. पुणे बातम्या

पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

error: Content is protected !!