Homeताज्या बातम्यामालकाच्या घरातील ३० लाखांचे दागिने चोरणारा घरगडी जेरबंद; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मालकाच्या घरातील ३० लाखांचे दागिने चोरणारा घरगडी जेरबंद; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणे: डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालकाच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या घरगड्यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शहाजी लक्ष्मण ढोबळे (वय ५९, रा. जनवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
​नेमकी घटना काय?
डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार (गु.र.नं. १४७/२०२६, भा.न्या.सं. क. ३०६), फिर्यादी यांच्याकडील घरगडी शहाजी ढोबळे याने त्यांच्या घरातील वयोवृद्ध आईच्या खोलीतील कपाटातून सुमारे २० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरले होते. या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ३०,००,०००/- रुपये इतकी आहे.
​पोलिसांची कारवाई
तक्रार प्राप्त होताच डेक्कन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आरोपी शहाजी ढोबळे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर, १० जुलै २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व ३० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.
​अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान
ही कामगिरी पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
​मार्गदर्शक: अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) कृषिकेश रावळे आणि सहायक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) अनुजा देशमाने.
​पोलीस पथक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपना देवतळे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तसेच पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्धकी, महेश काळे, संजय दंडगुले, स्वप्निल गायकवाड आणि महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लालबहादूर शास्त्री स्मारकाचा कारभार रामभरोसे! ​कागदपत्रांशिवाय काम सुरू; जबाबदारीवरून मनपा विभागांमध्ये ढकलाढकली

पुणे | प्रतिनिधी ​भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता समोर येत असून, पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे संपूर्ण प्रकल्प...

HP गव्हर्नर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात. पुणे बातम्या

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर गुप्ता (डावीकडे), आणि एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड पुणे : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर...

‘माझा मुलगा, मग माझे बाबा 20 दिवसांत गमावले’: केतन अग्रवालच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे या प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्याची विनंती केली आहे. पुणे: आठवडाभरात आपला मुलगा आणि वडील दोघेही गमावल्याने शोक...

मोशी बिल्डींग गुहा-इन साठी ट्रिगर: मुसळधार पाऊस, गळती आणि बांधकाम गुणवत्ता, तज्ञ म्हणतात |...

मोशीतील इमारतीच्या गुहेभोवती ७० फूट कचरा आहे पुणे : मोशीतील बुधवारच्या आपत्तीचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर जाणून घ्यायचे आहे की कचऱ्याच्या डोंगरापासून...

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसोबत लाखो लोक भक्ती करत असताना पुण्याचा...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सायंकाळी पुणे शहरात आगमन झाले. पुणे : पिंपरी चिंचवडच्या पावसाने भिजलेल्या आसमंतात गुरुवारी अंधुक पहाट पडताच, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी...

error: Content is protected !!