Homeताज्या बातम्यामुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य मदत; भाजप वैद्यकीय आघाडीचा सक्रिय सहभाग

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य मदत; भाजप वैद्यकीय आघाडीचा सक्रिय सहभाग

वाघोली,
प्रसाद सोनवणे,तालुका प्रतिनिधी,पुणे.

: केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच गरीब, गरजू आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य संकलन व वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वाघोली येथे श्री. संदीप आबा सातव, सौ. रत्नमाला ताई सातव आणि श्री. महेंद्र भाडळे यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान व सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला श्री. प्रदीप सातव, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजपा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

शिबिराचे वैद्यकीय नियोजन व डॉक्टरांचे संयोजन डॉ. मच्छिंद्र बाबासाहेब काशिद यांनी केले. IMHS हॉस्पिटलचे डॉ. रघुनाथ रामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग व सुपर स्पेशालिटी तपासणी, CBC, शुगर, ECG, औषधोपचार व वैद्यकीय सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्रतपासणी व पुढील उपचारांसाठी कूपनचे वाटप करण्यात आले. तसेच वाघोली ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले.

डॉ. मच्छिंद्र बाबासाहेब काशिद म्हणाले, “मुरली अण्णांनी रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मागील वर्षी आम्ही २५० रक्तपिशव्यांचे संकलन केले होते. यंदाही रक्तदानासोबत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य संकलनाच्या आवाहनालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वरिष्ठ नेतृत्वाच्या आवाहनाला प्रत्यक्ष सेवाकार्यातून प्रतिसाद देणे आणि त्या कार्याची त्यांच्या हस्ते मिळणारी शाबासकीची थाप, यापेक्षा कार्यकर्त्यांसाठी मोठा सन्मान नाही. मुरली अण्णांचे प्रोत्साहन हीच आमची ऊर्जा असून भविष्यात याहून व्यापक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प आहे.”

वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता रक्तदानातून जीवदान, आरोग्यदानातून आरोग्यसेवा आणि अन्नधान्य मदतीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श संदेश देणारा ठरला. सेवेचा संकल्प, समाजाचा सहभाग आणि नेतृत्वाची प्रेरणा यातून मुरली अण्णांना अनोखी सामाजिक अभिवादनाची भेट देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा पुणे (औंध), दि. २६ (प्रतिनिधी : शशिकांत पाटोळे) : ७७ वा भारतीय संविधान दिन औंध येथे...

कोंढव्यातील वनक्षेत्रातील कथित बेकायदा वृक्षतोडीविरोधात आंदोलनाला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा!

पुणे : कोंढवा परिसरातील वनक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनाला 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'ने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील मंदार किवळे हल्लाप्रकरण: ६ आरोपी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई पुणे; दि. २६ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर...

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार!

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार! पुणे; दि. २५ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार झाल्याची...

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

error: Content is protected !!