पुणे:
केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी एकूण तीन चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
अशी झाली कारवाई
दिनांक २०/०६/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक अनुषंगाने पोलीस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार सचिन गाडे व प्रमोद भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र. नं २८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन एक इसम जांभुळवाडी तलावाजवळ बसला आहे, अशी माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे व पोलीस अंमलदारांनी तातडीने जांभुळवाडी तलाव येथील मोकळ्या जागेत छापा टाकला.
तिथे एका मोटारसायकलवर संशयास्पद रित्या बसलेल्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अजय मर्याप्पा जावीर (वय २९ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिराचे मागे, हनुमाननगर, शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) असे सांगितले.
सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली
आरोपी अजय जावीर याच्याकडे पोलिसांनी सखोल व कसून चौकशी केली असता, त्याने ताब्यात असलेली मोटारसायकल ही दि. १४/०६/२०२६ रोजी शनिनगर चौक येथील ‘हरिओम हार्डवेअर’ समोरून चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी तातडीने सदर गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त केली. अधिक तपासात त्याने भारती विद्यापीठ परिसर आणि पुणे स्टेशन परिसरातून देखील मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ३ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
मार्गदर्शन व कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
सदरची धडक कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२, पुणे शहर) श्री. मिलींद मोहिते, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चांगदेव सजगणे यांच्या थेट सूचनांनुसार या कारवाईत खालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली:
पोलीस उप-निरीक्षक: युवराज शिंदे
पोलीस अंमलदार:
चेतन गोरे
हणुमंत मासाळ
हरीश गायकवाड
निलेश जमदाडे
धनाजी धोत्रे
सचिन गाडे
प्रमोद भोसले
नितीन कातुर्डे
योगेश जगदाळे
सुभाष मोरे
अजय कामठे
ज्ञानेश्वर चित्ते
राकेश टेकवडे
शिवाजी पोटोळे
फिरोज शेख
या यशस्वी कामगिरीमुळे आंबेगाव पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























