राज्य राखीव पोलिस दल सेवा निवृत्त कर्मचारी संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहमेळावा व व्याख्यानाचे आयोजन
पुणे | प्रतिनिधी
दि. 26 जानेवारी 2026 रोजी राज्य राखीव पोलिस दल (SRP) गट क्रमांक 2, लेक्चर शिर्के हॉल, वानवडी, पुणे येथे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य राखीव पोलिस दल सेवा निवृत्त कर्मचारी संघ, पुणे यांच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध हास्यकथानाथक श्री शांतीनाथ रामचंद्र मांगले साहेब यांचे मनोरंजक व प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या विनोदी शैलीतून त्यांनी पोलिस दलातील अनुभव, सेवा काळातील आठवणी आणि समाजातील सकारात्मक मूल्ये यांचे सुंदर
सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या हास्यपूर्ण कथनामुळे संपूर्ण सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे संस्थापक श्री आर. डी. जाधव साहेब, उपाध्यक्ष श्री व्ही. जी. तळवार साहेब, संयोजक श्री राकेश डी. जाधव, श्री प्रसाद आर. जाधव तसेच श्री गुंगा जगताप साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व नियोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी पंजेतन पवित्र संघटना यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री हनीफभाई शेख,
पंजेतन पुणे शहर महिला आघाडी ग्रुप उपाध्यक्ष कु. फिजा शेख,
कार्याध्यक्ष सौ. फलक शेख,
कोंढवा अध्यक्ष सौ. सना शेख
यांच्या हस्ते श्री आर. डी. जाधव साहेब व श्री गुंगा जगताप साहेब यांना प्रजासत्ताक दिन सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेला हा स्नेहमेळावा सर्व उपस्थितांच्या स्मरणात राहील असा ठरला.
एकूणच हा कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा व आपुलकी निर्माण करणारा ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















