लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अभिवादन
दिनांक: १ ऑगस्ट २०२५
पुणे – संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील अग्रणी, श्रमिक वर्गाचे महान प्रवक्ते आणि क्रांतीकारक विचारांचे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुण्यातील सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित आणि दलित वर्गाच्या न्यायासाठी आयुष्य वेचले. त्यांनी दिलेले सामाजिक समतेचे आणि बंधुतेचे संदेश आजही तितकेच महत्वाचे आणि प्रेरणादायी आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याचा आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्ता घुले, समन्वयक पराग थोरात, विभागप्रमुख सूरज लोखंडे, रूपेश पवार, निलेश वाघमारे, संदीप गायकवाड, नागेश खडके, सूरज खंडाळे, अमोल घुमे, महेश चव्हाण, विजय रावडे, राम बटुंगे, दिलीप पोमन, पुरुषोत्तम विटेकर, राहुल शेडगे, गणेश पोकळे, नितीन थोपटे, शिवाजी मेलेकरी, रोहित कुचेकर, महिला आघाडी च्या विद्या होडे, पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाळ, सुलभा तळेकर, करुणा घाडगे, सीमा गायकवाड, ज्योती वीर, उपस्थित होते.


नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























