Homeताज्या बातम्यालोहार समाज भूषण पुरस्काराने ‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’चे कार्यकारी संपादक सागरभाऊ शत्रुघ्न...

लोहार समाज भूषण पुरस्काराने ‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’चे कार्यकारी संपादक सागरभाऊ शत्रुघ्न लोहार यांचा गौरव!

केज (बीड) | सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित ‘लोहार समाज भूषण पुरस्कार वितरण समारंभा’‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे कार्यकारी संपादक आणि समाजसेवक मा. सागरभाऊ शत्रुघ्न लोहार (पिंपरी-चिंचवड) यांना ‘लोहार समाज भूषण पुरस्कार 2025’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम सकल लोहार समाज कृती समिती, केज (जि. बीड) यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 25 ऑक्टोबर 2025) अत्यंत उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सागरभाऊ लोहार हे केवळ पत्रकारितेतच नव्हे तर सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. ‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’ या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, प्रशासनिक आणि भ्रष्टाचारविरोधी मुद्द्यांवर जनजागृती केली आहे. त्याचबरोबर वंचित घटक, कामगार वर्ग आणि युवकांना दिशा देण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आनोराज अनंत होते, तर प्रमुख उपस्थिती श्री. आवाड विलास यांनी लावली. समाजातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना सागरभाऊ लोहार म्हणाले,

> “हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ माझा नाही, तर संपूर्ण लोहार समाजाचा आणि ‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’च्या कार्याचा सन्मान आहे. समाजासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी माझं कार्य असंच सुरू राहील.”

या गौरवामुळे लोहार समाजासह पिंपरी-चिंचवड परिसरात आनंदाचे वातावरण असून, सागरभाऊंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!