साहित्यिक व अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन – पर्यावरण, साहित्य क्षेत्रात मोठी हानी
ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनामुळे साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्राची अपूरणीय हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे. क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमार्फत आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण जीवन वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या अभ्यासासाठी अर्पण केले. वृक्ष, पाने, फुले, पक्षी, प्राणी, डोंगर यांसारख्या निसर्ग घटकांची माहिती असलेला चालता-बोलता निसर्ग विश्वकोश अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या सर्जनशील लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयीची जाणीव आणि संवेदना अधिक बळकट झाली. अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभव त्यांनी मराठी वाचकांना दिले.
वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा करत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांनी संवर्धनाच्या दिशेने जे प्रयत्न केले, त्यामुळे ही अभयारण्ये आज जैवविविधतेचे आदर्श उदाहरण ठरली आहेत.
पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यास क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य देखील अत्यंत प्रभावी ठरले.
३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या कार्याचा हा सन्मान होताच, पण त्या पुरस्कारानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या निधनाची बातमी आलेली असल्याने ती आणखी वेदनादायक ठरते.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज परिवाराकडून त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन व श्रद्धांजली!

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























