Homeताज्या बातम्यासोलापुरात लोहार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र सभामंडप व ‘लोह उद्योग’ उभारण्याची मागणी

सोलापुरात लोहार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र सभामंडप व ‘लोह उद्योग’ उभारण्याची मागणी

सोलापूर शहर
भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांची सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट
सोलापूर : सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर येथे भाजपा आमदार मा. विजयकुमार देशमुख यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान लोहार समाजाच्या विविध विकासात्मक प्रश्नांवर व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सोलापूर शहरात लोहार समाजासाठी स्वतंत्र सभामंडप उभारण्यासाठी जागा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सोलापूर एम.आय.डी.सी. परिसरात लोहार समाजातील पारंपरिक कारागिरांसाठी ‘लोह उद्योग’ उभारण्याकरिता स्वतंत्र जागा व आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून समाजातील कारागीर व युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी मागणी शिष्टमंडळाने मांडली.
लोहार समाजातील पारंपरिक कारागिरांकडे असलेल्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे तसेच पारंपरिक व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी शासन स्तरावर ठोस प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लोहार समाजाच्या विकासासाठी ‘लोह उद्योग’ उभारणी, रोजगार निर्मिती, जागेची उपलब्धता आणि आवश्यक शासकीय निधी याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सकल लोहार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीस मा. दादासाहेब कळसाईत, मा. महेश दादा लोहार, पै. आबासाहेब कळसाईत, बालाजी लोहार, उमेश टिंगरे, निखिल लोहार, सुयश पवार, सौरभ पवार, ओंकार बारडोळे, सचिन टिंगरे, रामेश्वर कांबळे, महादेव लोहार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सकल लोहार समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!