स्मार्ट सिटीच्या नावाखाली वानौरीत नियमभंग! – दोन फूट परवानगी, पण फक्त आठ इंच खोदकाम करून ठेकेदारांचा खेळ सुरू?
पुणे | प्रतिनिधी
पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत वानौरी येथील क्लोव्हर सिटाडेल, ऑक्सफर्ड व्हिलेज सोसायटी रोड, केदारीनगर परिसरात केबल टाकण्याच्या कामात गंभीर नियमभंग उघड झाला आहे.
नियमावलीनुसार २ फूट खोदकाम करून केबल टाकण्याची परवानगी असतानाच, संबंधित ठेकेदाराकडून केवळ ८ इंच खोल खोत करून पाईप टाकण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले आहे.
या बेकायदेशीर कामामुळे रस्त्यांची पायाभूत रचना, पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईनला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक आणि समाजकार्यकर्त्यांनी याबाबत पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे आणि संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
—
नागरिकांचा सवाल:
> “स्मार्ट सिटीच्या नावाखाली नियम मोडले जात असताना PMC अधिकारी नेमके काय पाहत आहेत?”
नागरिकांच्या मते, जर हे काम खरेच मंजूर आराखड्यानुसार चालले असते, तर खोदकामाचे माप, सुरक्षा उपाय व तपासणी यांचे नोंद PMC कार्यालयात उपलब्ध असायला हवेत. पण प्रत्यक्षात तशी कोणतीही पारदर्शकता दिसत नाही.
—
आमिर मोहम्मद शेख (Crime Maharashtra Live News) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार :
> “या परिसरात झालेल्या नियमभंगाबाबत PMC Smart City विभागाने तात्काळ पंचनामा करून अहवाल जाहीर करावा. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.”
—
तक्रारीची मागणी पुढीलप्रमाणे :
1. प्रत्यक्ष स्थळ तपासणी व पंचनामा.
2. ठेकेदार व जबाबदार PMC अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई.
3. आतापर्यंत झालेले खोदकाम व खर्चाचा अहवाल सार्वजनिक करणे.
Crime Maharashtra Live चे आवाहन:
स्मार्ट सिटीच्या नावाखाली चालणाऱ्या अशा बेफिकीर व नियमभंग कामांवर PMC व Smart City विभागाने कठोर भूमिका घ्यावी.
अशा ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना जबाबदार धरले नाही तर “स्मार्ट सिटी” नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























