पुणे: २४ तासांत आरोपी निष्पन्न; हडपसर पोलिसांची जलद कारवाई
पुणे (दि. ०९ एप्रिल २०२६) : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या पोक्सो गुन्ह्यात अज्ञात आरोपीचा शोध घेऊन अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत हडपसर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील केशव कृपा जनरल स्टोअर्स, राम मंदिराजवळ किराणा साहित्य घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अज्ञात इसमाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तात्काळ हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात भा.दं.सं. कलम ३५४ तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओंकार बाळकृष्ण कोरडे (वय २६ वर्षे, रा. प्रफुल्ल कॉलनी, काळेपडळ, पुणे) असे असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली MH-12-YF-5246 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
तपास पथकाने सर्व पुरावे जलदगतीने गोळा करून अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र तयार करून मा. न्यायालयात सादर केले आहे.
ही कारवाई मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ श्री. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रियांका कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























