Homeताज्या बातम्याहडपसर पोलीस स्टेशन: सम्राट गार्डन सोसायटी येथील चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा,...

हडपसर पोलीस स्टेशन: सम्राट गार्डन सोसायटी येथील चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा, ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

​पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा हडपसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण ३,५०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी:
​दिनांक ०३/०७/२०२६ रोजी रात्रौ २०:०० वाजल्यापासून ते दिनांक २३/०७/२०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजेपर्यंतच्या कालावधीत, सम्राट गार्डन सोसायटीमधील फिर्यादी यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अनधिकृतपणे प्रवेश केला. फ्लॅटमधील बेडरुममधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोराने चोरी करून नेले. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४९२/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​तपास आणि कारवाई:
​गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊन दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) विजय पाटील व तपास पथक सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे करत होते.
​तपास सुरू असताना तपास पथकातील अंमलदार कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार व महावीर लोंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हा यश हॉस्पिटल जवळ, माळवाडी, हडपसर, पुणे येथे थांबला आहे. सदर माहिती मिळताच सपोनि विजय पाटील यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईची खातरजमा केली.
​तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ यश हॉस्पिटल, माळवाडी येथे जाऊन पाहणी केली आणि आरोपी फैजल इसरार खान (वय १८ वर्षे, रा. मु. ढकाई, पो. मगदुमपुर ढोकसहा (मेढराह), जि. कोशांबी, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. माळवाडी हडपसर, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
​हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल:
​आरोपीच्या ताब्यातून एकूण २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत:
​सोन्याची चैन: १६ ग्रॅम
​सोन्याची चैन: ०६ ग्रॅम
​सोन्याची रिंग: ०१ ग्रॅम
​एकूण किंमत: ३,५०,०००/- रुपये
​सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.
​तपास पथकाची कामगिरी:
​सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर श्री. जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​तसेच हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, निलेश किरवे, भाऊसाहेब कटके, विजय कानेकर, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, धीरज शेलार, महावीर लोंढे व कृष्णा घोळवे यांनी या संपूर्ण कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळींनी जल्लोष साजरा केला. पुणे बातम्या

पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते की डेटा सुरक्षित आहे. पुणे बातम्या

तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

शिरूरमध्ये बिबट्याने 2 वर्षात पाचव्या चिमुकल्याचा बळी घेतल्याने भीतीचे वातावरण. पुणे बातम्या

पिंपळसुती, मांडवगण फराटा आणि शेजारची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास प्रदान करणारे बारमाही जलस्रोत यांच्या...

विश्वचषक सुवर्णविजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास | पुणे बातम्या

पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

मुंढवा पोलीस स्टेशन: MPDA अंतर्गत स्थानबद्ध असलेला पाहिजे आरोपी जेरबंद

पुणे, दिनांक २५ जुलै २०२६: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विहित कायदेशीर कारवाई करत एमपीएए...

error: Content is protected !!