Homeताज्या बातम्या१०० कोटी रुपयांची वक्फ मालमत्ता हडप प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह...

१०० कोटी रुपयांची वक्फ मालमत्ता हडप प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे: १०० कोटी रुपयांची वक्फ मालमत्ता हडप प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

लक्ष्मीनगर रस्त्यावरील १७,३०० चौ. फू. जागेवरील बांधकाम थांबले; वक्फ मंडळाच्या निर्णयामुळे मुस्लिम समाजाला दिलासा

पुणे: सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक अन्वर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील लक्ष्मी रस्त्यावरील १७,३०० चौरस फूट क्षेत्रफळाची सुमारे ₹१०० कोटी किंमत असलेली मौल्यवान मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि त्यांच्या काही साथीदारांनी हडपल्याचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकताच हा भूखंड ‘वक्फ’ बोर्डाचा असल्याचे घोषित केल्यानंतर, पुणे महापालिकेने या जागेवर सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवले आहे.

वक्फ मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

डॉ. महमंदखान करीमखान आणि त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी १९३५ साली ही मालमत्ता वक्फला दान केली होती. १९३६ च्या वक्फनाम्यात स्पष्ट केले होते की, या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी, दफनविधी आणि गरिबांच्या लग्नकार्यासारख्या समाजोपयोगी कार्यासाठी खर्च केले जावे. मात्र, त्यांच्या पश्चात या जमिनीचा गैरवापर सुरू झाला.
अनेक वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर, वक्फ मंडळाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी हा भूखंड ‘वक्फ’ मालमत्ता असल्याचे घोषित करत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

सध्या या भूखंडाचा ताबा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि त्यांच्या सहकारी व्यक्तींकडे आहे. सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी आरोप केला आहे की, “आमदार धंगेकर अनेक वर्षे महापालिकेत नगरसेवक होते. या पदाचा गैरवापर करून त्यांनी वक्फ असलेली मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी लाटली आणि त्याठिकाणी मोठे बांधकाम सुरू केले.”

महापालिकेने बांधकाम थांबवले

वक्फ मंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून हे बांधकाम थांबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार, महापालिकेच्या बांधकाम विभागाने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मे. उत्कर्ष असोसिएटसतर्फे प्रतिक सुनील आहिर व इतरांना हे बांधकाम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

वक्फ मंडळाने जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत की, या मालमत्ता पत्रकाच्या मालकी हक्कात वक्फ संस्थेचे (डॉ. महमंदखान करीमखान बीबी राबिया वक्फ) नाव लावून खासगी व्यक्तींची नावे कमी करावीत.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

या दुर्दैवी प्रकाराबद्दल बोलताना अन्वर शेख म्हणाले, “एका लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक वापरासाठी, गोरगरिबांसाठी दान केलेल्या वक्फ जागेचा स्वतःच्या हितासाठी वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी वक्फ मंडळाने आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा आणि मालमत्तेचा ताबा लवकरात लवकर वक्फ बोर्डाकडे घ्यावा.”

अन्वर शेख यांनी वक्फ बोर्डाकडे अर्ज करून प्रॉपर्टी कार्डवरून खासगी व्यक्तींची नावे कमी करून वक्फ बोर्डाचे नाव त्वरित नोंदवण्याची मागणी केली आहे.

संपर्क:
*अन्वर शेख*
*मोबाईल: ८४५९८६७८३८*

टीप: हे प्रसिद्धी पत्रक सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांच्या वतीने पत्रकार/ प्रसार माध्यमांसाठी जारी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!