Homeताज्या बातम्या१७ दिवसांपासून तहानलेली जनता — शिवसेनेचे हंडा-कळशी आंदोलन!जनता वसाहत परिसरातील पाणीटंचाईविरोधात प्रशासनाला...

१७ दिवसांपासून तहानलेली जनता — शिवसेनेचे हंडा-कळशी आंदोलन!जनता वसाहत परिसरातील पाणीटंचाईविरोधात प्रशासनाला निवेदन

पुणे (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :
जनता वसाहत परिसरातील गल्लीनंबर ८८ ते १०८ या भागामध्ये मागील १७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा एक थेंबसुद्धा पुरवठा झालेला नाही. या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पर्वती विभागा तर्फे स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या भेटीत हंडा-कळशी घेऊन प्रतीकात्मक आंदोलन करून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आला.

निवेदनाद्वारे प्रशासनाकडे स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की —
• जनता वसाहतीला तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
• तसेच वाघजाई येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सुरक्षारक्षक नेमून CCTV कॅमेरे बसविण्याची तातडीने कार्यवाही करावी.

शिवसेनेतर्फे प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, नागरिकांच्या या मूलभूत गरजेकडे जर दुर्लक्ष केले गेले, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सदर आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना विभागप्रमुख सूरज लोखंडे यांनी केले.
यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, गटनेते अशोक हरणावळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक पराग थोरात, किशोर रजपूत, दिलीप पोमण, निलेश वाघमारे, सचिन जोगदंड, गणेश घोलप, सूरज खंडागळे, वैभव बर्गे, संजय साळवी, अनेश रेणुसे, ऋषिकेश ठोंबरे, मुन्नाभाई शेख, शान शेख, हजरत माणिकभाई, नरेंद्र गंजे, महिला आघाडीच्या सीमा मगर, ज्योती वीर, नाझ इनामदार, अल्पना मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनातून नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, “जनतेच्या तहानेचा प्रश्न हा आता आमचा लढा बनला आहे” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कळावे,
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख, पुणे शहर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!