Homeताज्या बातम्याअहिल्यानगर मनमाड रस्त्यावर झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे ठार तर कृष्णा गोल्हार जखमी

अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे ठार तर कृष्णा गोल्हार जखमी

अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे ठार तर कृष्णा गोल्हार जखमी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
शिवाजी दवणे 9730170965

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी अपघात झाले. डिग्रस फाटा परिसरात झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला तर शिंगणापूर फाटा परिसरात झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे हे जागीच ठार झाल्याची घटना समोर आली.
शशिकांत तुकाराम दुधाडे, वय ६५ वर्षे, रा. मुंजोबा नगर, राहुरी हे आज दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजे दरम्यान त्यांच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवर विद्यापीठ येथे गेले होते. नातवाला शाळेत सोडल्यानंतर शशिकांत दुधाडे हे मोटर सायकलवर विद्यापीठ कडून राहुरीकडे येत असताना नगर मनमाड महामार्गावर धरमाडी गेस्ट हाऊस जवळ त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत शशिकांत दुधाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांना तातडीने राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या दरम्यान राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार, वय २२ वर्षे, हा तरुण तो अपघात पाहण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवर जात असताना शनी शिंगणापूर फाटा परिसरात त्याच्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत कृष्णा गोल्हार हा गंभीर जखमी झाला असून त्याला अहिल्यानगरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शशिकांत दुधाडे यांच्या अपघाताची माहिती समजतात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे संचालक हर्षद तनपुरे, आर आर तनपुरे, नंदूभाऊ तनपुरे, गजानन सातभाई, राजेंद्र बोरकर, राजेंद्र दुधाडे, किशोर दुधाडे, पप्पू कोरडे, कांता तनपुरे, संतोष आघाव, पांडूभाऊ उदावंत आदीसह शेकडो नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
मयत शशिकांत दुधाडे हे शहरातील डाॅ. सुहास दुधाडे व संकेत दुधाडे यांचे वडील होत. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र नगर मनमाड महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून मृतांची देखील संख्या वाढली. गेल्या पंधरा दिवसात राहुरी तालुका हद्दीत विविध ठिकाणी अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झालाय. यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेडिंगच्या बहाण्याने १.४० कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून बेड्या

​पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण...

महाराष्ट्र दिनी पुण्यात ‘पर्यावरण’ रणकंदन; ५२९ वारसा वृक्षांच्या कत्तलीविरोधात शेकडो पुणेकर रस्त्यावर

पुणे | १ मे २०२६: एकीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करत असताना, पुण्यात मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशखिंड...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

error: Content is protected !!