सविस्तर बातमी:
पुणे:
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २३/०७/२०२६ ते दिनांक २६/०७/२०२६ या कालावधीत गुजरवाडी कात्रज व शिवाजीनगर परिसरात टोळी प्रमुख आरोपी सुरज ठोंबरे व त्याच्या gang मधील इतर सदस्यांनी आंदेकर गँगच्या सदस्यांसोबत (आयुष कोमकर, गणेश काळे व इतर) फौजदारी कट रचला होता. दिनांक २६/०७/२०२६ रोजी केलेल्या हत्येचा बदला व अक्षय म्हर्केच्या खुनाच्या प्रयत्नाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगमधील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर व तुषार वाडकर यांना शिवाजीनगर कोर्टमध्ये आणले असता, त्यांना शिवाजीनगर कोर्ट येथून पोलीस गाडीमधून धुळे व नंदुरबार येथे घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता.
आग्नेयस्त्र बाळगून शिवाजीनगर कोर्टापासून ते कुरोळी चाकण पर्यंत रेकी करून, सुरज ठोंबरे याने वेळोवेळी आंदेकर व वाडकर यांच्या वाहन ताफ्यांची माहिती दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अटक व पाहिजे आरोपींची नावे:
तपासा दरम्यान खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत:
अटक आरोपी १: वेदांत रोहित सावंत (वय २१ वर्षे, रा. वनराई कॉलनी, केशवगर नगर, प्रियदर्शन मराठी स्कुल शेजारी, धनकवडी, पुणे).
अटक आरोपी २: अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१ वर्षे, रा. अरुणप्लाजा फ्लॅट नंबर ४०६, गुजरवाडी कात्रज, पुणे, मूळ गाव मु.पो. नाझरे, ता. भोर, जि. पुणे).
अटक आरोपी ३: धिरज लखारा (रा. धनकवडी, पुणे).
पाहिजे आरोपी ४: सुरज अशोक ठोंबरे (वय २४ वर्षे, रा. नानापेठ, पुणे).
पाहिजे आरोपी ५: मानव शरद ढमाले (वय २४ वर्षे, रा. सावरकर चौक, धनकवडी, पुणे).
पोलीस अधिकारी व मार्गदर्शन:
सदर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी मा.पो.उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलिंद मोहिते यांचे मार्फ़तीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांना मकोका लावण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मंजुरी दि. २६/०८/२०२६ रोजी राहुल आवारे, सहायक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांनी दिली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे:
श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर)
मा. संजय दराडे (पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)
श्रीमती. तेजस्विनी सातपुते (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर)
श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर)
श्री. मिलिंद मोहिते (पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर)
मा. राहुल आवारे (सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग)
तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष जाधव, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, आणि पोलीस अंमलदार विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल, सचिन सरपाले यांनी ही कामगिरी केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,




















