Homeताज्या बातम्याऐतिहासिक प्राचीन नवसाला पावणाऱ्या हजरत शेख सलाहुद्दीन चिश्ती निजामी सिद्दिकी अलगारी अलगाजी...

ऐतिहासिक प्राचीन नवसाला पावणाऱ्या हजरत शेख सलाहुद्दीन चिश्ती निजामी सिद्दिकी अलगारी अलगाजी रहमतुल्लाह अलैह बाबांचा ६८८ वा ऊर्स मोठ्या जल्लोषात

ऐतिहासिक प्राचीन नवसाला पावणाऱ्या हजरत शेख सलाहुद्दीन चिश्ती निजामी सिद्दिकी अलगारी अलगाजी रहमतुल्लाह अलैह बाबांचा ६८८ वा ऊर्स मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात संपन्न. ऐतिहासिक भाकरीचा नैवेद्य अर्पण |कसबा पेठ पुणे गेल्या ६८८ वर्षांपासूनची परंपरा; हिंदू-मुस्लिम सर्वधर्म पूर्वपरंपरेनुसार चालून आलेल्या 688 व्या सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतीक असलेल्या उर्साची आज 24 एप्रिल रोजी सांगता.

पुणे प्रतिनिधी इरफान सय्यद

पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या सहा दिवसीय उर्स उत्सव 19 एप्रिल ते आज दिनांक 24 एप्रिल रोजी उत्साहात संपन्न दिनांक 19 रोजी सायंकाळी सहा वाजता (ध्वजारोहण) परचम कुशाई दिनांक 20 रोजी कलशारोहण व दर्ग्याला दूध व सुगंधित पाण्याने गुसूल (स्नान) संध्याकाळी मंगळवार पेठ जुना बाजार हजरत शेखसल्ला चिल्ला दर्गा शरीफ येथून कसबा पेठ दर्गाह पर्यंत भव्य दिव्य संदल मिरवणूक काढण्यात आली रात्री धर्मगुरूंच्या उपस्थितीत बाबांना संदल व चादर अर्पण करण्यात आली. त्यावेळेस मिलाद ,सलाम, फातेहा व सर्व लोकांच्या जगाच्या कल्याणासाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले 21 रोजी दिवसा कुरआन ख्वानी रात्री मेहफिले समा व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिनांक 22 रोजी रात्री रातीबुल रिफाई चा चित्तथरारक कार्यक्रम करण्यात आला दिनांक 23 रोजी बाबांची नाचणीची रोटी(भाकरी) तसेच नवस करणार्‍या लोकांनी जरब टोचून हजारोंच्या संख्येने भाविक बाबांच्या चरणी श्रद्धेने उपस्थित होते सर्वांसाठी मोठ्या महाप्रसादाचे आयोजन होते.तसेच दिनांक 24 रोजी अजमेर शरीफ हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचे छट्टी निमित्त खीर आणि बाबांच्या उर्स सांगता निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि कव्वाली चा कार्यक्रम करण्यात येऊन सर्वांसाठी प्रार्थना करून सांगता करण्यात आली.
दरवर्षी उरसात हजरत ख्वाजा शेख सलाहुद्दीन बाबांच्या (छोटा शेख सल्ला) दर्ग्यात मोठ्या भक्तिभावाने नाचणीची भाकरी, चवळीची भाजी आणि कांद्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. गेल्या ६८८ वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली ही परंपरा सुरू आहे.
यंदाही यादवकालिन जुन्या श्री काळभैरवनाथ मंदिरापासून गुरुवारी मिरवणूक काढून दर्ग्यात नैवेद्य अर्पण करण्यात आला.
शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवेकाळापासून ही परंपरा सुरू आहे. या उरसात गुरुवारी पारंपरिक वाद्य आणि नगारखान्यासह काढण्यात आलेली नैवेद्य मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. जुन्या श्री काळभैरवनाथ मंदिरापासून रामरहीम मित्र मंडळ,गावकोस
मारुती, रविवार पेठ, खंडोबा मंदिर, शिंपी आळी, पवळे चौकातून दर्गामार्गे ख्वाजासाहेब दर्ग्यापर्यंत काढण्यात आली. या प्रसंगी अनेक मंडाळांच्या राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शेरा आणि चादर अर्पण करण्यासाठी दर्गा परिसरात गर्दी केली होती.
शेखसलाहुद्दीन बाबा दर्ग्यात नैवेद्य अर्पण करण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक
तसेच, नवस फेडण्यासाठी देखील भाविकांची गर्दी झाली होती. नवस पूर्व झाल्यावर भाविक जरब टोचून घेतात.
शुक्रवारी (दि. २४)खीर वाटप आणि बहारदार कव्वालीच्या कार्यक्रमांनी आठवडाभर सुरु असलेल्या या उत्सवाची सांगता झाली.

शहाजीराजे , छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांपर्यंत पीरबाबांच्या दिवाबत्ती व उत्सवासाठी इनाम दिलेले आहे. उत्सवात हिंदू-मुस्लिम तसेच सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

शेख सलाहुद्दीन बाबांनी देवरकर बाग (जुना बाजार) येथे गेणुजी देवरकर यांचे बैल जिवंत केले होते. त्यानंतर शेख सलाहुद्दीन बाबांना नाचणीची भाकरी, चवळीच्या भाजीचे जेवण केले होते. तसेच समाधीनंतर देखील हे जेवण आजतागायत चालू आहे, गेल्या ६८८ वर्षांपासून नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुरु असून, हा उत्सव सामाजिक ऐक्याचे
प्रतीक आहे. अमित देवरकर, मानकरी, (नाचणीची भाकरी नैवेद्य)

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मौलाना अबुल कलाम आझाद फ्रेंड सर्कल, कसबा पेठ मुस्लिम जमात, अध्यक्ष ताजुद्दीन भाई शेख आधारस्तंभ मुनाफभाई शेख सलमानभाई अत्तार राजू भाई सय्यद परवेज भाई तांबोळी आणि इतर सर्वधर्मीय सहकार्यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. पुणे बातम्या

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे. पुणे बातम्या

पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

पुणे शहरात अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई; परिमंडळ-७ मध्ये ११ आरोपी जेरबंद

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विशेष मोहिमेत परिमंडळ-७ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष...

पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक १ ने सहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या एका फरार आरोपीला अटक...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला. पुणे बातम्या

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

error: Content is protected !!