Homeताज्या बातम्याऑनलाईन ट्रेडिंगच्या मोहापायी स्वतःच्याच सोसायटीतील फ्लॅटवर डल्ला; कोंढवा पोलिसांकडून अल्पवयीन आरोपी जेरबंद

ऑनलाईन ट्रेडिंगच्या मोहापायी स्वतःच्याच सोसायटीतील फ्लॅटवर डल्ला; कोंढवा पोलिसांकडून अल्पवयीन आरोपी जेरबंद

पुणे: ऑनलाईन ट्रेडिंगचे वेड आणि त्यातून झटपट पैसे कमावण्याच्या मोहापायी स्वतःच्याच सोसायटीतील एका रहिवाशाच्या फ्लॅटमध्ये चोरी करणारा १९ वर्षीय तरुण कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या तरुणाने वॉचमनच्या केबिनमधून चावी चोरून फ्लॅट फोडला होता. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
​नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक (येवलेवाडी) येथील कमल प्रभा अपार्टमेंट सोसायटीतील फिर्यादी रहिवासी कामानिमित्त घराबाहेर जात असताना नेहमीप्रमाणे आपल्या फ्लॅटची चावी सोसायटीच्या वॉचमनकडे ठेवून गेले होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत एका अनोळखी इसमाने वॉचमनच्या ड्रॉवरमधून चावी चोरली आणि फ्लॅट उघडून आतील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची नाणी लंपास केली. याप्रकरणी कोंढवा-येवलेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग
गुन्ह्याचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे आणि त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. सोसायटीतील वॉचमनकडे चावी ठेवल्याची माहिती केवळ ओळखीच्या लोकांनाच होती, त्यामुळे ही चोरी सोसायटीतीलच कोणीतरी केल्याचा संशय पोलिसांना आला. तपास करताना असे समोर आले की, आरोपीने चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते आणि फ्लॅटबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल फासला होता.
​पोलीस अंमलदार गणेश चिंचकर, सुजित मदन आणि मयुर मोरे यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत सीसीटीव्ही बंद होण्यापूर्वीच्या फुटेजची पाहणी केली. यामध्ये सोसायटीत राहणारा प्रतिक राजेंद्र शर्मा (वय १९ वर्षे, रा. कमल प्रभा सोसायटी, शत्रुंजय मंदिराच्या जवळ, कान्हा हॉटेल चौक, कोंढवा बुद्रुक) हा वॉचमन बाहेर गेल्याची संधी साधून संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने केवळ ऑनलाईन ट्रेडिंगच्या मोहापायी ही चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.
​पोलीस पथकाचे अभिनंदन
ही धडाकेबाज कारवाई पुणे शहर पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) राजलक्ष्मी शिवणकर आणि वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयुर मोरे आणि सुजित मदन यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार | पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा. पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

error: Content is protected !!